“शिवणी” ची अवंती रामटेके नवोदय परिक्षेत मेरीट ..!

केंद्रीय नवोदय समिती नवी दिल्ही मार्फत जानेवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय प्रवेशत परिक्षेत सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शिवणी शाळेची अवंती प्रदिप रामटेके मेरीट आली आहे .

शिवणी केंद्रातील जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेची अवंती इयत्ता पाचवी ची विद्यार्थीनी असून तिची शैक्षणिक सत्र 2020-21 साठी जवाहर नवोदय विद्यालय बाळापूर तलोधी जिल्हा चंद्रपूर ला निवड झालेली आहे.
तिने आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षक जे के मेश्राम ,मुख्याध्यापक अशोक तळवेकर, प्रभारी केन्द्र प्रमुख अजय सायन्कार, सिंदेवाही गत साधन केंद्राचे विषयतज्ञ रेवन मोहूर्ले यांना दिले आहे .

अवण्तीच्या या अभूतपूर्व यशामध्ये तिच्या शाळेचे मार्गदर्शक शिक्षक जे के मेश्राम यांचा सिंहाचा वाटा असून त्यांनी यापूर्वी वासेरा सारख्या ग्रामीण भागातील एकाच शाळेतील तब्बल तिन गरिब विध्यार्थीना नवोदय परिक्षेत मेरीट आणलेले आहे, हे इथे उल्लेखनीय आहे. मागील वर्षी चंद्रपूर जिल्हा परिषद मूख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डिले, डायट चंद्रपूरचे प्राचार्य डा. विलास पाटील व प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपेण्द्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनात सिंदेवाही शिक्षण विभाग व बामसेफ अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील शंभर विध्यार्थीना तज्ञ मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी विशेष योगदान दिले आहे .तसेच शैक्षणिक सत्र 2019-20 मध्ये सिंदेवाही शिक्षण विभाग अंतर्गत आयोजित केण्द्रस्तरीय शिक्षण परिषदमधून नवोदय विध्यार्थी व शिक्षकांना गट साधन केंद्राचे विषयतज्ञ रेवन मोहूर्ल व त्यांच्या सहकारी विषयतज्ञनी विशेष मार्गदर्शक केले होते .

अवण्तीच्या या दैदिप्यमान यशाबद्दल तिचे शाला व्यवस्थापन समिती अध्यक्ष वासुदेव चणे, सरपंच नामदेव खोब्रागडे, पंचायत समिती सभापती मधुकर मडावी, गटशिक्षणाधिकारी संजय पालवे, विषयतज्ञ प्रा.भारत मेश्राम सह समस्त शिक्षकव्रुन्दानि विशेष कौतूक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!