सप्तरंग आजचे संक्षिप्त बातमी अपडेट / २१-जून -२०२/रविवार

🔴 ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

💁‍♂️ सप्तरंग आजचे संक्षिप्त बातमी अपडेट / २१-जून -२०२/रविवार

📣 राज्यात काल 3 हजार 874 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत .

📣 त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख 28 जार पेक्षा जास्त झाली आहे.

📣 तर देशातील एकूण रुग्णांची संख्या आता ३ लाख 95 हजार पेक्षा जास्त झाली आहे.

📣 डिजीटल मंचावरुन आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होणार तसेच या योग दिनानिमित्त *नमस्ते योगा* या मोहिमचे आयोजन केले आहे.

📣 सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्ररकरणी सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधच्या –

📣 याचिकेला कोर्टाची मंजुरी मिळाली आहे तसेच यावर त्यांची ३० जूनला साक्ष नोंदवली जाणार आहे .

📣 आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया यंदा शाळास्तरावरच राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे –

📣 यासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश प्रक्रिया २४ जूनपासून सुरू होणार आहे.

📣 माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येत्या १४ जुलै रोजी जलसंपदा व पाणीपुरवठा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या –

📣 व्यक्तींना *जलभूषण पुरस्कार* देण्यात येणार आहे अशी माहिती राज्य शासनाच्या वतीने देण्यात आली.

📣 नाफेडने चणा खरेदीची मुदत १५ जुलैपर्यंत वाढवली आहे राज्यात अजुनपण लाखो क्विंटल चणा शेतकऱ्यांच्या घरात पडलेला होता.

📣 शाळा सुरू होण्याची तारीख अद्यापही निश्चित नसली तरी विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचीत राहू नये ,

📣 यासाठी येत्या जुलै महिन्यापासून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्याचा निर्णय – शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

📣 प्रत्येक राज्यात कोरोना रुग्णांना उत्तम उपचारासाठी वैद्यकीय तज्ञांचा गट नेमा – असे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना दिले आहेत.

📣 आज रविवार २१ जूनला आपल्याला कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे .

📣 सूर्यग्रहणामुळे कोरोनाचा प्रभाव कमी होऊ शकतो किंवा नाही याविषयी सोशल मीडियावर अनेक बातम्या व्हायरल होत आहेत

📣 मात्र सूर्यग्रहणाचा कोरोनावर तिळमात्र परिणाम होणार नाही असे खगोल अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.

One Reply to “सप्तरंग आजचे संक्षिप्त बातमी अपडेट / २१-जून -२०२/रविवार”

 1. मा.आदरणीय विठ्ठल आवळेजी सप्रेम नमस्कार.
  आजचा अंक अतिशय सुंदर आणि ज्ञानवर्धक आणि प्रबोधनात्मक आहे.विशेषत: माझा प्रासंगिक लघ लेख लावल्या बद्दल आपले मनापासून आभार.
  या निमित्ताने आपण एकत्र आलो आहोत.भले भोगोलीक अंतर अधिक असेल, परंतु मन आणि भावनिक अंतर न ठेवता यापुढे आपण सौबत राह या.
  आपल्या प्रत्येक विधायक कार्यात सदैव आपल्या सोबत आहे हे सदैव ध्यानी असं द्या.
  धन्यवाद !

  विठ्ठलराव वठारे
  अध्यक्ष सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंच सोलापूर.
  joshaba1001@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *