पाच वर्षाच्या चिमुकलीवर 30 वर्षीय नराधमाचा लैंगिक अत्याचार ; आरोपीला अटक

🔴 ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )
 
◼️ ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन येथे आरोपीना अटक केली
 
चंद्रपूर, ( २१ जून ) : ब्रम्हपुरी येथील भगत सिंग चौक पेठ वार्ड तील एका पाच वर्षीय चिमुकलीवर त्याच वार्डातील ३० वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना आज २१ जुन रोजी उघडकीस आली. पीडीत चिमुकली बाहेर अंगणात खेळत असताना आरोपी सचिन सुधाकर उर्फ जयवंत बगमारे हा चॉकलेट घेऊन देतोय म्हणून कडेवर घेऊन आपल्या घरी गेला. तेव्हा पीडित मुलीची आई व तीनं मुले आरोपी सचिन च्या घराकडे निघाले.नराधमाच्या घरासमोर आरडाओरड केल्यानंतर सचिनने दरवाजा उघडला. तेव्हा पीडित मुलीला आरोपी ने काय केले असे विचारले असता तीच्या सांगण्यावरून तीच्या वर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.
यानंतर पीडीत मुली चे वडील शेतातुन घरी आल्यावर पीडित मुलीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आरोपी सचिन सुधाकर उर्फ जयवंत बगमारे यांच्या वर अल्पवयीन मुलीला बळजबरीने पळवून तीच्या वर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती पीडीत चिमुकली मुलीच्या तोंडी रिपोर्ट वरून ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन येथे ३७६,(A),(१),३७६(AB)३६३,भादवी सहकलम ४,८,१० बाललैंगिक अत्याचार कायदा २०१२अन्वे गुन्ह्याची नोंद करून आरोपी सचिन बगमारे यास अटक करण्यात आली.
पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक तथा पॉस्को पथक विभाग ब्रम्हपुरी व पो.हवालदार सतीश गुरुनले हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *