अखेर ” त्या “बामणीत धुमाकुळ घालणाऱ्या पट्टेदार वाघाला वनविभागाने केले जेरबंद…

🔴 ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

नागभिड,(२१ जून) : – 
नागभीड पासून ४ अंतरावरील बाम्हणी या गावामध्ये रविवारला दुपारचे ०४:०० वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघाने एका घरात प्रवेश करून आश्रय घेतला होता. त्या वेळी शेतकरी मनोहर पाल रा.बम्हणी यास वाघाने जखमी केले. घरात वाघ घुसल्याची वार्ता गावभर व आजूबाजूच्या परिसरात पसरली असल्याने लोकांची वाघास बघ्यांची गर्दी झाली होती. वनविभागाला घटनेची माहीती मिळताच घटना स्थळ गाठले.

वनविभागाने या वाघास पकडण्यासाठी गोठ्याच्या आजू बाजूने जार टाकून पकडण्याची पूर्णपणे तयारी केली. चंद्रपूर ईथुन डॉक्टर येईपर्यंत गावकऱ्यांनी शांतता राखावी याकरीता नागभीड पोलीस स्टेशन चे पोलीस पथक दाखल करण्यात आले.

   कुठल्याही प्रकारची जनतेला हानी पोहचू नये याची सर्तकता बाळगत वाघाला जेरबंद करण्यासाठी शर्तीचे  प्रयत्न केले.

वाघास पकडण्याचे प्रयत्न ४ वाजेपासून तर रात्रीचे १०:०० वाजेपर्यंत प्रयत्न सुरू होते . शेवटी डॉक्टरांनी ट्रॅक्यूलाईज करून वाघास बेशुद्ध केले व वाघास वनविभागाने पकडुन पिंजऱ्यात जेरबंद केले.

अखेेेर वनविभागासह जनतेने वाघ जेरबंद झाल्याने सुटकेचा श्वास घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *