आंतरराष्ट्रीय योग दिन टेलीमेडीसीन येथून ऑनलाइन पद्धतीने साजरा

🔴 ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

चंद्रपूर, दि. 23 जून: कोरानाचे संकट अद्यापही कायम असल्याने नागरिकांना एकत्र येण्यास बंदी असल्यामुळे यावर्षी 6 वा 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्हा सामान्य रुग्णालय (आयुष विभाग) व जिल्हा परीषद (आरोग्य विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने टेलीमेडीसीन येथुन झुम ॲपद्वारे ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड व जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत केलेल्या योगदिनाच्या कार्यक्रमात चंद्रपुर जिल्हातील सर्व उप जिल्हा रुग्णालय, ग्रामिण रुग्णालय, प्राथमीक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी जुळून योग प्रात्यक्षिके केलीत. आयुष विभागातील योगशिक्षक मनोज अमझरे यांनी आसन व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करत दैनंदिन जिवनात योगाचे महत्व पटवून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *