माता न तू वैरिणी ! जुळ्या मुली झाल्याने आईनेच पाण्याच्या टाकीत बुडवुन केली एकीची हत्या

🔴 ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

🔷 निर्दयी माताच निघाली चिमुकलीची हत्यारी, जुळवा मुली झाल्याचा संताप

या घटनेची माहीती मिळताच समाजमन सुन्न झाले. या प्रकरणी पवणी पोलीसांनी निर्दयी मातेविरूध्द हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला असुन परीसरातील काही सदस्यांनाही चौकसीसाठी ताब्यात घेतले आहे. अल्फीया निश्चय रामटेके (२२) रा.गौतम वार्ड असे तिचे नाव आहे. २६ दिवसापूर्वी अल्फीयाला जुडवा मुली झाल्या. अल्फीयाला मुलगा हवा होता मात्र मुली झाल्याने ती बाळंतपणापासुन संताप व्यक्त करत होती.सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान अल्फीया शौचास बाहेर गेली परत आली तेव्हा खाटेवर एकच मुलगी होती दुसर्या मुलीला कुणी उचलून नेले कसे दर्शवून शोधाशोध सुरु केली.

स्नानगृहाच्या बाजुला असलेल्या पाण्याच्या टाक्यात २६ दिवसीय चिमूकलीचे शव आढळून आले. पाण्याच्या टाक्यात चिमूकलीचा शव पाहून निश्चय रामटेके यांना संशय आला त्यामुळे त्यांनी थेट पवणी पोलीस ठाण्यात तक्रार केली.त्यावेळी पवणी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.उपविभागीय पोलीस अधीकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक यसवंत सोलसे तपास करीत आहेत.आरोपी अल्फीया रामटेके हीला अटक झाली नव्हती,मात्र परीवारातील काही सदस्यांना चौकसीसाठी पोलीसांनी ताब्यात घेतल्याची माहीती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *