पावसाळा सुरू होऊनही नाली सफाईचे काम अपूर्णच ; कुंभेझरी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष


🔴 ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

( विजय राठोड, जिवती प्रतिनिधी )

जिवती, (24 जून) – तालुक्यातील कुंभेझरी येथे पावसाळा लागूनही नाल्याच्या उपसा केलेला नाही. नालीचा उपसा न केल्यामुळे नाली पूर्ण भरल्या आहेत. सांडपाणी रस्त्यावरुन वाहू लागले आहे. तर काही लोकांच्या घरात पाणी घुसत असल्याने गावातील लोकाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
याच प्रमाणे काही वॉर्ड मध्ये नाल्या सांडपाण्याने गच्च भरल्या असल्याने डासाची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून गावात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण होत आहे. ग्रामपंचायत प्रशासन नेहमीच गावच्या विकासाच्या दृष्टीने दुर्लक्ष करीत आहे. विजेचि समस्या तर या गावात नेहमीच असते.
ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देऊन नाली उपसा करावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *