लॉकडाऊन काळातील ग्राहकांचे विज बिल माफ करा – राजू झोडे

🔴 ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

🔷 पोंभुर्णा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

पोंभुर्णा, (२४ जून ): कोरोना महामारीत सर्वसामान्य माणूस होरपळत असतांना व पुढील जिवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना विज ग्राहकांना वारेमाप विज बिल आल्याने विज ग्राहक चिंताचूर झाला आहे. त्याकरिता गेल्या तिन महिण्याचे लॉकडाऊन काळातील विज बिल माफ करावे याकरीता पोंभुर्णा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना उलगुलान संघटनेच्या वतीने संघटनेचे संयोजक रुपेश निमसरकार, पदाधिकारी निशाल मेश्राम, कार्यकर्ते दौलत देवगडे, म़गल लाकडे, निश्चल भसारकर, वसंत नरसपूरे, सरीता उराडे, प्रतिमा पेन्दोर, रघुनाथ बांबोळे, किशोर केमेकार आदी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

मागील लॉकडाऊन काळापासून जनतेच्या हाताला काम नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. अशातच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने सर्व विज ग्राहकांना सरसकट तिन महिण्याचे वारेमाप विद्युत बिल पाठविले आहे. एकत्रितरित्या बिल पाठवल्या मुळे पुर्वी येणाऱ्या साधारण बिलापेक्षा तिनपट, चारपट विजबिल आलेले आहेत. विजेचा दर व इतर आकार व भारामुळे अवाजवी विज बिल आकारण्यात येत आहेत.

वास्तविक पाहता लॉकडाऊन काळातील विजबिल सरसकट माफ करण्यात यावे व मिनीमम स्लँब आकारुन नवीन विजबिल आकारण्यात यावे. या मागणीसाठी पोंभुर्णा तालुक्यात उलगुलान संघटनेच्या वतीने विजबिलाची होळी करुण्यात आली. ही रास्त मागणी मान्य न झाल्यास यापुढे उलगुलान संघटनेच्या वतीने ऊग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांच्या मागदर्शनात पोंभुर्णा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *