आजचे संक्षिप्त बातमी अपडेट / २७-जून -२०२०/शनिवार

💁‍♂️ आजचे संक्षिप्त बातमी अपडेट / २७-जून -२०२०/शनिवार

📣 राज्यात काल 5 हजार 24 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत .

📣 त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 52 हजार पेक्षा जास्त झाली आहे.

📣 तसेच देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 4 लाख ९० हजार पेक्षा जास्त झाली आहे

📣 सराफा बाजारात आज शनिवारी सोने १६० रुपयांनी स्वस्त झाले. आज मुंबईत सोन्याचा भाव प्रती दहा ग्रॅम ४७ हजार ९०० रुपये झाला.

📣 शुक्रवारी तो ४८ हजार ०६० रुपये होता तसेच चांदीचा भाव आज ४७ हजार ७०० रुपये प्रती किलो झाला आहे.

📣 प्रसिद्ध फेअरनेस क्रीम ‘फेअर अ‍ॅण्ड लव्हली’ या क्रीमच्या नावातून ‘फेअर’ हा शब्द काढून टाकण्याचे कंपनीने ठरविले आहे.

📣 याबाबतची माहिती कंपनीचे अध्यक्ष संजीव मेहता यांनी दिली .

📣 एसटीला वाचविण्यासाठी कर्मचारी वर्ग स्वतः स्वेच्छाने निवृत्त होण्यास तयार आहे. त्यामुळे महामंडळाने अशी निवृत्ती लागू करा

📣 अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस या संघटनेच्यावतीने – परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे करण्यात आली आहे.

📣 राज्यभरात शाळांना फी वाढीची मनाई राज्य सरकारने केली होती ,राज्य सरकारच्या या निर्णयाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे.

📣 देशभरात गेल्या २४ तासांत १७ हजार २९६ रुग्णांची नोंद झाली हि आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली .

📣 हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज २७ जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी

📣 तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

📣 राज्यात यापुढे लॉकडाउन होणार नाही तर फक्त अनलॉक दोन आणि तीन असणार आहे –

📣 अशी मोठी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे त्यामुळे अनेक दिलासा मिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *