◼️ बोधकथा…

◼️ बोधकथा…..

एक शेठजी आपल्या कुत्र्यासोबत होडीतून नदी पार करत होते. तो कुत्रा पहिल्यांदाच होडीत बसला होता. नाव नदीतून वेगाने पुढे जात होती. पण हलणाऱ्या नावेमुळे कुत्रा घाबरला, सर्वबाजूनी पाणी पाहून खाली वर उड्या मारू लागला. कुत्र्याच्या अशा गोंधळामुळे नावेतील लोकांना नाव बुडण्याची भीती वाटत होती. सर्वांची भीतीदायक अवस्था शेठजीच्या लक्षात आली. पण ते सुध्दा कुत्र्याला ताब्यात ठेवण्यात अपयशी ठरत होते. नावेत एक बुध्दिमान संत होते. संत शेठजीला म्हणाले तुमची आज्ञा असेल तर मी या कुत्र्याला ताब्यात आणू शकतो.

शेठजीने आज्ञा दिली. संत ऊठले आणि त्यांनी कुत्र्याला धरून नदीत फेकले. कुत्रा घाबरला आणि पोहत-पोहत नावेत येण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला मरणाची भीती वाटत होती. संतांनी लगेच त्या कुत्र्याला पकडले आणि नावेत घेतले. आता तो कुत्रा शांतपणे एका जागेवर बसला होता. शेठजी आणि नावेतील सर्व लोकं हे पाहून आश्चर्यचकित झाले की कुत्रा शांत कसा बसला. शेठजीने संतांना याचे कारण विचारले, संत म्हणाले- कुत्र्याला जेव्हा पाण्यात फेकले, तेव्हा त्याला पाण्याची ताकद आणि नावेचे महत्व समजले. याच कारणामुळे आता हा शांत बसला आहे

कथेची शिकवन-
जोपर्यंत आपण स्वत एखाद्या अडचणीचा सामना करत नाहीत तोपर्यंत दुसऱ्यांच्या समस्यांचे महत्व आपल्याला कळणार नाही. यासाठी आपण सुद्धा दुसऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहीजे. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *