चिमूर वरोरा मार्गावरील अपघातात दुचाकीस्वार ठार

🔴 ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

चिमूर / प्रतिनिधी

चिमूर वरोरा मार्गावरील लोखंडी पूल जवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वार कुणाल विलास नन्नावरे वय 15 वर्ष हा हायवा ट्रक अपघातात ठार झाला असून एक जखमी झाला आहे ताडगाव ता समुद्रपूर जिल्हा वर्धा येथील कुणाल विलास ननावरे हा आपल्या मित्रांसह मोटरसायकल ने चिमूर कडे येत असताना ओव्हरटेक करण्याच्या नादा मध्ये हायवा ट्रक क्रमांक mh-40 Bl- 8663या ट्रक ने अपघात झाल्याने दुचाकीस्वार कुणाल हा जागीच ठार झाला मृतक स्वतःमोटर सायकल क्रमांक Mh 34 X0695 ही स्वतः चालवीत होता दुसरा जखमी झाला असून उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे सदर ट्रक चालक याचे विरुद्ध कलम 279, 337,304 अ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून ट्रक चालक महेंद्र अशोक चावट रा. गाणगापूर ता.उमरेड जी नागपूर यास अटक करन्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *