विवाहितेवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न, तरूणावर ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल

सिंदेवाही ( प्रतिनिधी ): सिंदेवाही- पोलिस स्टेशन चे हद्दीतील ७ किलोमीटर अंतरावरील जामसाळा (जुना) या गांवात विवाहितेवर तरूणाने अतिप्रसंग केल्याचा प्रकार उघडकीस आला.

‌‌ सविस्तर वृत्त असे की, सिंदेवाही पासुन ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या जामसाळा (जुना) येथील फिर्यादी विवाहित महिला वय २९ वर्षे हिचे तक्रारीवरून गावातीलच आरोपी नामे चंद्रशेखर रामदास नैताम वय ३४ वर्षे याला सिंदेवाही पोलिसांनी दिनांक- २९/०६/२०२० अटक केली.आरोपी हा फिर्यादी विवाहित महिला आपले घरी एकटीच झोपून असता, तिचे घरात प्रवेश करुन, व आतून दार बंद करून, तिचे छातीवर बसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याबाबत फिर्यादीने प्रत्यक्ष पोलिस ‌स्टेशनला येऊन दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून, सिंदेवाही पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी हा विवाहित असून, लग्नाची पहिली व दुसरी पत्नी सुद्धा त्याचेजवळ राहात नसल्याचे कळते. सदर आरोपी विरूद्ध अ. क्र.- ३३५/२०२० अन्वये कलम ४५२, ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक केली आहे. गन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार निशिकांत रामटेके यांचे मार्गदर्शनाखाली ए. एस. आय. अनिल गेडाम हे करित असल्याचे पोलीस सुत्रांनुसार कळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *