आई प्लीज… तो बलात्कार नव्हे… प्रेम आहे आमचे’

“आई प्लीज…तो बलात्कार नव्हे…प्रेम आहे आमचे”

जयश्री गरुड खांब परिसरात राहते तर आरोपी आदित्य देशमुख झेंडा चौक महालमध्ये राहतो. जयश्री बारावीत असताना तिने महालमध्ये ट्युशन क्‍लास लावला होता. त्याच इमारतीत स्पर्धा परीक्षेचे क्‍लासेस चालायचे. त्या क्‍लासेसमध्ये आरोपी आदित्य देशमुख क्‍लास करीत होता. आदित्य गांधीबागमधील एका बॅंकेत नोकरीसुद्धा करीत होता. तसेच एका नामांकित ढोल पथकात वाद म्हणून काम करीत होता. दोघांची ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले. रोज क्‍लासमध्ये दोघांच्या भेटी होत होत्या.

नागपूर : जयश्री (बदललेले नाव) बारावीची विद्यार्थिनी तर आदित्य देशमुख एका बॅंकेत नोकरीला. ट्युशन क्‍लासेमध्ये दोघांची ओळख झाली. एकमेकांचा मोबाईल क्रमांक घेऊन ओळख वाढली. दोघांचे प्रेम फुलले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. घरी कुणी नसताना दोघांनीही अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. चार महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर तिच्या आईला संशय आला. डॉक्‍टरांकडे नेल्यानंतर बिंग फुटले. आईने तिचा हात पकडला आणि थेट पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी जयश्रीच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री गरुड खांब परिसरात राहते तर आरोपी आदित्य देशमुख झेंडा चौक महालमध्ये राहतो. जयश्री बारावीत असताना तिने महालमध्ये ट्युशन क्‍लास लावला होता. त्याच इमारतीत स्पर्धा परीक्षेचे क्‍लासेस चालायचे. त्या क्‍लासेसमध्ये आरोपी आदित्य देशमुख क्‍लास करीत होता. आदित्य गांधीबागमधील एका बॅंकेत नोकरीसुद्धा करीत होता. तसेच एका नामांकित ढोल पथकात वाद म्हणून काम करीत होता. दोघांची ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले. रोज क्‍लासमध्ये दोघांच्या भेटी होत होत्या.

दोघेही फुटाळा, अंबाझरी आणि लॉंग ड्राइव्हला जात होते. यादरम्यान दोघांची मैत्री घट्ट झाली. आदित्य आणि जयश्रीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. जयश्री बारावीत असल्याने 18 वर्षे पूर्ण झाल्यावर आई-वडिलांना सांगून लग्न करूया, असा प्लान तयार झाला. दरम्यान दोघेही हातात हात घालून फिरायला लागले. आदित्यच्या घरी कुणी नसल्यास ती थेट त्याच्या घरी जायला लागली. माझी मैत्रीण असल्याचे त्याने तिची ओळख घरी करून दिली. तर आदित्यलाही तिने दोनदा घरी नेऊन आईशी भेट घालवून दिली. फक्‍त मित्र आहे, एवढी ओळख दिली.

दोघांच्या प्रेमाने सीमा ओलांडली. एकदा आदित्यने घरी कुणीही नसल्यामुळे जयश्रीला घरी बोलावले. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. परंतु, आता लग्नच करणार आहे, असे सांगून आदित्यने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मात्र आदित्यच्या घरी कुणी नसल्याची संधी साधून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. तर कधी जयश्रीसुद्धा त्याला घरी बोलावत होती.
पोट दुखले आणि बिंग फुटले

जयश्री जवळपास चार महिन्यांची गर्भवती झाली. तिने पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. आईने तिला डॉक्‍टरांकडे नेले. डॉक्‍टरांनी तपासणी करून ती गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे आईला धक्‍काच बसला. आईचा विश्‍वास न बसल्यामुळे डॉक्‍टरांना पुन्हा चेकअप करण्यास सांगितले. मात्र, डॉक्‍टरांनी थेट रिपोर्ट दाखवून चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले.

🔴  आईनको गं… तो माझा प्रियकर आहे

आईने दवाखान्यातच जयश्रीच्या कानाखाली दिली. कोण आहे तो? अशी विचारणा केली. आदित्य देशमुखचे नाव सांगताच पुन्हा चिडली. घरी नेल्यानंतर हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. सर्वांनी पोलिसांत तक्रार करण्याचे ठरविले. मात्र, जयश्री पोलिसांत तक्रार देण्यास तयार नव्हती. “आई तो माझा प्रियकर आहे… आम्ही लवकरच लग्न करणार आहोत… आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे…’ असे म्हणून समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

  🔴  प्रियकराविरुद्धगुन्हा दाखल

प्रियकर आदित्य देशमुख याच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानेही जयश्रीवर प्रेम असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, तिचे वय केवळ 17 वर्षे असल्याने कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, पोलिस ठाण्यात जयश्री आणि आदित्य दोघेही एकमेकांकडे बघून रडत होते, अशी स्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *