पोलिस-नक्षल चकमकीत एक नक्षली ठार

◼️ पोलिस-नक्षल चकमकीत एक नक्षली ठार

🔴 ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

सी-60 पथकाचे जवान हेडरी गावालगतच्या जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिस जवानांनी प्रत्युत्तरादाखल नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला.

गडचिरोली : एटापल्ली तालुक्‍यातील हेडरी पोलिस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या हेडरी-गट्टा जंगल परिसरात सी- 60 पथकातील पोलिस जवान आणि नक्षल्यांमध्ये शुक्रवारी (ता.3) सकाळी चकमक उडाली. यात एका नक्षल्याचा खात्मा करण्यात आल्याची माहिती आहे.

सी-60 पथकाचे जवान हेडरी गावालगतच्या जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिस जवानांनी प्रत्युत्तरादाखल नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात एक नक्षली ठार झाला. पोलिस जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षली जंगलात पसार झाले. घटनेनंतर हेडरी परिसरातील जंगलात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *