नागभिड तालुक्यातील मांगरूड शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार

🔴 ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )
🔷 नागभिड तालुक्यातील मांगरूड शेतशिवारातील घटना
नागभिड,(४ जुलै ) – नागभिड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या गोंविदपूर उपक्षेत्रातील मांगरूड येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात मजूर ठार झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास उजेडात आली. वाघ हल्ल्यात मृत व्यक्ती मारोती माधवराव उईके, सोनुली असे नाव आहे.
नागभीड तालुक्यातील तळोधी  जवळील सोनुली येथील बोरकर नामक शेतमालकाच्या मांगरूड शेतशीवारात शेतीकाम करण्यासाठी मारोती हा गेला होता. शेतशिवारात औषध फवारनीचे काम शेतात सुरु असल्याचे सांगण्यात येते.शेतशिवार परिसरात शिरकाव केलेल्या वाघाने मारोती उईके याचे वर हल्ला करून ठार केल्याची घटना दुपारच्या सुमारास उजेडात येताच तळोधी वनविभागाला कळविण्यात आले. पुढील कार्यवाही वनविभाग करीत आहे.
 मृतक मजूराच्या पश्चात पत्नी , २ मुली , एक मुलगा , आई , वडील असा परिवार आहे. या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सोनुली परिसरातील नागरिकात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शेतशिवार परिसरात वाघाच्या वास्तव असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले असलेल्याने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा अशी मागणी नागरिकांत केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *