◼️काव्यरंग

०००० गझल झाडीची ००००
————————————-

गरिबावर मरते माहांगाई,
संगामंगा फिरते माहांगाई…

कंगालाची करते संगत
कवटारुन धरते माहांगाई…

आंड्यावर आल्याच्यावानी
करकरते फरते माहांगाई…

वास तिलं गा सिरमंताची
दूर दूर परते माहांगाई…

जेती जेती भिकारवाडा
घरात दुक भरते माहांगाई…

टाटावरची आंबिल-चटनी
आंदिच का गिरते माहांगाई…

खाता खाता घास हिलगते
आतडीच पिरते माहांगाई…

दुक्काच्या फाटक्या बोतरित
पांगरते सिरते माहांगाई…

गवताच्या खोपडीत हिरसुन
बोदबोद गरते माहांगाई…

दुस्काडाना फसल बहकली
वावरात चरते माहांगाई…

पोरीच्या लग्नात गरीबा
हुंड्याना चिरते माहांगाई…

✍️ लोकराम शेंडे, बुट्टीबोरी, नागपूर

       🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷

…….. काव्यरंग ……..

गरीब त्या पोटाची ती भुक होती
माझ्या कवितेची त्यात काय चुक होती…

विझलेल्या चुलीवर संसार माझा जळत होता
अन् गीळलो पोटात जे मी ती माझीच थुक होती…

दुर्दैवी स्वप्नांचा येथे अनपेक्षित झाला चुराडा
खरेच का रात्री काजव्यांची (?) नजर अंधूक होती…

होते इमान माझे घाबरून छताखाली झोपलेले
अन् मोकळी फिरत त्यांची बेईमान बंदूक होती…

धरणी माते तुझाही असा आम्हावरी प्रकोप का?
संपली का तुझ्या कृपेची भरली जी संदूक होती…

केला केव्हाच आमुच्या पोटातील आतड्यांचा लिलावा
मग दारावर हात जोडणारी ती कसली भिक्षूक होती…

गल्लीबोळात उडणारा नंगा थवा पाखरांचा
नसीब दुःखाचे ओळखाया कोणीच शुक नव्हती…

आलिंगनात माझ्या तिची इतकीच मागणी होती
हळदीच्या जागी कुंकू एवढीच टुक टुक होती…

माझ्या कवितेची त्यात काय चुक होती….
✍️  खुशाब लोनबले, पवनपार, जि. चंद्रपूर

मो. ९६८२१३००८५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *