पहिल्याच दिवसापासून तिच्या पदरी दु:ख मिळाले अन्‌ जिवाच्या आकंताने पळत सुटली..!

पहिल्याच दिवसापासून तिच्या पदरी दु:ख मिळाले अन्‌ जिवाच्या आकंताने पळत सुटली…

विवाहितेची माहेरची स्थिती जेमतेम असल्याने पैसा आणण्याचा प्रश्‍नच येत नाही. त्यामुळे सासरच्या मंडळीकडून अत्याचारात वाढ झाली. 25 मे रोजी याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी पती घरी आला होता. यामुळे सासरच्या मंडळीची हिंमत आणखी वाढली.

पुसद (जि. यवतमाळ) : लग्न होऊन उणेपुरे एक वर्ष झाले. मात्र, नवविवाहिता सासरीच होती. तर पती मुंबईला. अनेकदा विचारणा केल्यानंतरही पती मुंबईला सोबत नेत नव्हता. या कारणावरून नवविवाहित पती-पत्नीत वादंग झाले. यानंतर सासूने तिचे हात पकडले. तर सासऱ्याने बिसलेरीतून अंगावर रॉकेल शिंपडले. पती गळ्यावर वार करणार तोच हाताला झटका देत नवविवाहितेने धीटपणे थेट शहर पोलिस स्टेशन गाठले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा यवतमाळ. तालुका पुसद. परिसर मंगलमूर्तीनगर. येथील मुलगा याचा वर्षभरापूर्वी विवाह झाला. मोठे स्वप्न रंगवून मुलीने सासरी प्रवेश केला. मात्र, पहिल्या दिवसापासून तिच्या पदरी दु:ख मिळाले. कारण, लग्न झाल्यानंतर पती मुंबईला निघून गेला अन्‌ पत्नीला सासरीच ठेवले. आज ना उद्या पती आपल्याला मुंबईला नेईल या आशेवर ती होती.

मात्र, लग्नानंतर लगेच मुंबईला गेलेल्या पतीने तिला सोबत नेले नाही. त्यामुळे ती वर्षभरापासून पतीकडे तगादा लावत होती. एकेदिवशी पती बोलला अन्‌ तिच्या पायाखालची जमीनच सरकली… पतीने मुंबईला यायचे अन्‌ राहायचे असेल तर माहेरहून दहा लाख रुपये आण, असे उत्तर दिले. कारण, मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी पतीने दहा लाखांची मागणी केली होती. मात्र, पत्नीला इतकी मोठी रक्‍कम देणे शक्‍य नव्हते. 

विवाहितेची माहेरची स्थिती जेमतेम असल्याने पैसा आणण्याचा प्रश्‍नच येत नाही. त्यामुळे सासरच्या मंडळीकडून अत्याचारात वाढ झाली. 25 मे रोजी याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी पती घरी आला होता. यामुळे सासरच्या मंडळीची हिंमत आणखी वाढली.

सासरच्या मंडळींनी माहेरून दहा लाख रुपये आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. मात्र, तिने नकार दिला. मग त्यांच्यात चांगलचे वादंग झाले. यामुळे चिडलेल्या सासूने तिचे हात पकडले. तर सासऱ्याने बिसलेरीतून अंगावर रॉकेल शिंपडले. पती गळ्यावर वार करणार तोच हाताला झटका देत नवविवाहितेने धीटपणे थेट शहर पोलिस स्टेशन गाठले. तिने धीर एकवटून पोलिसांमध्ये स्त्री अत्याचाराचा भंडाफोड केला. 

🔴 मनाविरुद्ध लावून दिले लग्न

पोलिसांनी विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. यानुसार पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. यावेळी पती गणेश मंदाडे याने पोलिसांना सर्व आपबिती सांगितली. मुंबई येथील एका मुलीशी प्रेम असल्याचे त्याने सांगितले. यामुळे तो पत्नीला मुंबईला नेण्यास अत्सुक नव्हता. घरच्या मंडळींना ही गोष्ट माहीत असूनही मनाविरुद्ध लग्न लावून दिले. हे सांगताना पोलिसही चकित झाले.

🔴 मुलाच्या प्रेमसंबंधाबाबत होते माहित

सासर-माहेरचे एकमकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे घरच्यांनी त्यांचा विवाह लावून दिला. याचा अर्थ मुलीच्या घरच्यांना मुलाच्या प्रेमसंबंधाबाबत माहित होते. तरीही त्यांनी त्यांचा विवाह कसा लावला असा प्रश्‍न निर्माण होतो. 

🔴  हुंडाप्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

बाहेर कोरोनाचा प्रकोप सुरू असताना पुसद येथील मंगलमूर्तीनगरात महिला अत्याचाराचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी हुंडा प्रतिबंधक व स्त्री अत्याचाराविरुद्ध कायद्याअंतर्गत महिलेच्या तक्रारीवरून पती गणेश सासरे व सासू यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *