सिंदेवाही पोलिसांनी पकडली पाठलाग करून सहा लाखांची दारू

🔴 ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

सिंदेवाही, ( ५ जुलै ): पो.स्टे. सिन्देवाही येथील अधिकारी व कर्मचारी प्राप्त माहिती प्रमाणे खातगाव फाटयाकडे जात असताना एक चारचाकी वाहन भरधाव वेगाने नागभिड कडुन मुल रोडने निघुन गेली त्या गाडीचा पाठलाग करीत असताना मौजा कळमगाव फाटयाजवळ एक सिल्वर रंगाची मारूती ८०० कार क्र. एम.एच./३१ /सि.एम./२४५६ ही अंधारामध्ये संशयास्पद स्थितीत उभी असलेली दिसुन आली तिचे जवळ जाताच एक इसम हा पळुन जात असताना त्याचा पाठलाग करून त्यास पकडुन त्याचे वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये एकुण ४५ नग खडर्याचे खोके प्रत्येकी १०० नग याप्रमाणे प्रत्येकी ९० एम.एल.ने देशी दारूने भरलेली असा एकुण ६,००,००० रू सदर वाहन चालक आरोपी नामे होमराज पटवारू मोहुर्ले वय २४ वर्ष रा. शिरपुर ता. चिमुर जि. चंद्रपुर अप.क्र. ३४७/२०२० कलम ६५(अ) मदाका प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला नमुद आरोपीस अटक करण्यात आली असुन सदर कारवाई पोलीस ठाणे सिन्देवाही येथील पोउपनि गोपिचंद नेरकर, पोहवा देवानंद सोनुले नापोकॉ गणेश मेश्राम चासफो मुरलीधर कामडी यांनी केली. सदर गुन्हयाचा तपास ठाणेदार निशीकात रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि गोपिचंद नेरकर हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *