🔴 पंतप्रधाननरेंद्र मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट
⚡ भारत-चीन सीमेवरील तणाव सातत्याने वाढत आहे. असे असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.
👉 या भेटीत पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्वांच्या विषयावर चर्चा झाली.
🧐 दुसरीकडे, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही एक ट्विट केले आहे, यात “भारत इतिहासाच्या एका नाजूक वळणावरून जात आहे. आपण एकाच वेळी अनेक आव्हानांचा सामना करत आहोत.
📝 मात्र आपल्याला जी आव्हानं दिली जात आहेत, त्याचां सामना करण्यासाठी आपण दृढ निश्चयी असायला हवे,” असे म्हणण्यात आले आहे.
💫 भारत-चीन सीमेवर सुरु असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 जुलैला लडाखला भेट दिली होती.
📍 मोदींनी लष्कर, वायुसेना आणि इंडो तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) जवानांशी संवाद साधला. गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीत जखमी झालेल्या जवानांचीही त्यांनी विचारपूस केली होती.
🗣️ पंतप्रधान मोदींसोबत मुख्य संरक्षण सचिव CDS बिपीन रावत देखील लेह दौऱ्यावर होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव असताना थेट पंतप्रधान तिथे पोहोचल्याने भारताची आक्रमक भूमिका दिसून येत आहे.
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷