आज सकाळी 10.30 ला आकाशवाणी केंद्रावरून भाग-2; फोन इन कार्यक्रमाचे प्रसारण

आज सकाळी 10.30 ला आकाशवाणी केंद्रावरून भाग-2फोन इन कार्यक्रमाचे प्रसारण

ऐका ! जिल्हाधिकारी यांच्या सोबतचा कोरोना आणि प्रशासनाची तयारी विषयीचा संवाद

चंद्रपुर,दि. 10 जुलै: जिल्हा प्रशासनाने कोरोना जनजागृती संदर्भात आत्मभान अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत 17 जुन रोजी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी फोन इन कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी कोरोना आणि प्रशासनाची तयारी या विषयावर संवाद साधला होता. या कार्यक्रमाच्या भाग एकचे प्रसारण दिनांक 20 जुन रोजी झाले होते. भाग दोनचे उद्या दिनांक 11 जुलै शनिवारला सकाळी 10:30 वाजता आकाशवाणीवरून होणार आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी कशी आहे? जिल्ह्यातील कोरोना काळातील सद्यस्थिती काय आहे? प्रशासनातील यंत्रणा कशा पद्धतीने काम करीत आहे, असे अनेक प्रश्नांचं निरसन फोन-इन कार्यक्रमा अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

आकाशवाणी चंद्रपूरची निर्मिती असणाऱ्या या फोन-इन कार्यक्रमाचे आत्मभान अभिनातंर्गत जिल्हा माहिती कार्यालयाने नियोजन केले होते. या कार्यक्रमाचे प्रसारण दिनांक 11 जुलै शनिवारी सकाळी 10:30वाजता आकाशवाणी केंद्र चंद्रपूर येथून होणार आहे. नागरिकांनी आकाशवाणी केंद्र चंद्रपूरच्या 103मेगाहर्डस वर तसेच न्यूज ऑन एअर या ॲपवर प्रसारण ऐकावे, असे आवाहन करण्यात आले आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *