वाघोबाच्या दर्शनासाठी सिंदेवाहीत उडाला सोशल डिस्टंसिंग फज्जा !
◼️बघ्यांच्या गर्दीमुळे कोरोनाची भिती !
सिंदेवाही (चंद्रपूर)-
सिंदेवाहीत वाघाचा शिरकाव झाल्याने मोठी काल खळबळ उडाली. वाघाच्या हल्ल्यात एक इसम जखमी झाला. सहकारी राईस मिलच्या परिसरात झुडपामुळे वाघाचे अस्तीत्व आढळून आले नाही. वाघाचे पगमार्क आढळून वाघ कुठे दिसेना ! अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र वाघाने झुडपात दडी मारली होती. वनविभागाने त्या परिसरात दिवसभर वाघाली शोधमोहीमे सोबत वाघाला जेरबंद प्रक्रिया पाडत असतांना दिवस भर नागरिक वाघोबाच्या दर्शनासाठी आतूर झाले होते. जमेल त्या घरावरून वाघोबा पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. त्यात कोरोना भिती त्यांना जाणवली नसावी का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या भिती पोटी जगभरात गर्दी टाळण्याचे प्रबोधन केले जात आहे. भारतात ४ महीण्यापासून कोरोना प्रार्दुर्भावापोटी नियमावली बनवून लॉकडाऊन – अनलॉक प्रक्रिया राबविली जात आहे. दिवसेदिवस कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत आहे. सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी ( नले.) येथील २३ वर्षीय यूवक आज एक कोरोणा पॉझिटीव्ह आढळून आला आहे. त्यामुळे तालुक्यात पुन्हा कुणी बाधित होवू नये , बाधीत रूग्ण निघू नये साठी सर्तकता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. शासन व प्रशासनाचे नियम पाळणे आवश्यक आहे. सुरक्षित अंतर पाळणे हे गरजेचे झाले. तरी नागरिक शासन व प्रशासनाच्या सोशल डिस्टंटींगच्या नियमाचा फज्जा उडवत असल्याचे चित्र काल सिंदेवाहीत दिसून आले.
प्रशासनाच्या वतीने कडकपणे योग्य तो कारवाईचा बडगा उगारला जात नाही. तो पर्यत नागरिकांत प्रशासनाच्या नियमाचे उल्लंघन करण्याची हिम्मत होणार नाही. मात्र कारवाई करणार कोण असा प्रश्न उपस्थित होत असल्याने आपले दात , आपलेच ओठ म्हणण्याची पाळी येत आहे.
वाघोबाच्या दर्शनासाठी बघ्यांनी गर्दी केल्याचे बघावयास मिळाले मात्र बघ्यांना वाघोबाचे शेवट पर्यत दर्शनही घडले नाही हे त्यांचे दुर्देव…. न दिसणारा ” तो ” दिसू नको म्हणजे झालं ! म्हणजे ” तो ” पॉझिटीव्ह ? ◼️