◼️करोना आणि गनिमी कावा….

🔴 करोना आणि गनिमी कावा….

सह्याद्रीच्या अभेद्य डोंगर रांगाना जेव्हा करोना येऊन धडकला असेल,तेव्हा तो ही थोडा चपापला, या खर्याअर्थाने जागा झाला असेल, संपुर्ण जगाला आपल्या विशाल महाकाय विषाणू सैन्याद्वारे एका रोगाच्या साथीने आपल्या विळख्यात जखडनारा मी ह्या सह्याद्रीच्या डोंगर रांगाना ,दर्या खोर्यानां, नदी नाल्यानां,का भेदू शकत नाही, इथली माती,इथली माणसं का आपल्या प्रभावाखाली सहजा सहजी येत नाहीत. ह्या एका विचाराने आश्चर्य चकीत झाला असेल त्याला ही कसली तरी एक पुसट अस्पष्ट जाणीव आता झाली असेल…..

इथल्या अभेद्य खडकांना तो दुभांगू शकत नाही. इथल्या चिवट मातीत तो तग धरू शकत नाही.इथल्या शुद्ध हवेत तो पसरू शकत नाही. इथल्या निर्मळ पाण्यात तो मिसळू शकत नाही. मग ऐवढं असं काही असताना इथल्या अनकुल परस्थितीत वाढलेल्या काटक,कष्टाळू, स्वाभीमानी, माणसांच्या मनांवर तो आता किती दिवस राज्य करणार….
म्हणे काय ते जगाच्या तुलनेत भारतीयांची immunity power प्रतिकार शक्ती खुप आहे. आहो का आसणार नाही…ज्या माणसांची सुमारे जवळ जवळ ३५० वर्ष नुसत्या गुलामगिरीत गेली. हजारो हाफशींच्या पायखाली त्यांची मने तुडवून मेली. कोणी ही यावं घर, गाव राज्य, राष्ट्र लुटून न्हावं, जाळून सारं बेचीराक करावं. आई,बाईला उचलून न्हावं,अत्याचार करून झाडा झुडपात ऐखाद्या लावारीस जनावरा साराखं फेकून द्यावं, घरातील आई कुठे,बाप कुठे, बहिण कुठे, भाऊ कुठे कोण कोणत्या बाजारात निलाम होत होतं,कोण कोणाचं गुलाम होत होतं काही काही समजत नव्हत.अशा विस्कळीत,भयभीत. झालेल्या, आपलं अस्तित्व विसरलेल्या निर्जीव मनांच्या माणसांना एकत्र आणून राष्ट्रासाठी,धर्मासाठी, मातीसाठी जातीसाठी लढायला शिकवणार्या अशा एका असामान्य मातेपोटी जन्माला आलेल्या त्या सुर्या समान तेजस्वी पुत्राचं नाव छत्रपती शिवाजी होत.

महाराजांच्या स्वराज्य विचारांनी प्रेरीत होऊन खर्या अर्थाने इथला तरूण जागा झाला, स्वरक्षणासाठी, स्वराज्यासाठी त्याने जेव्हा हातात तलवार धरली, तेव्हा खर्या अर्थाने त्याच्या शरिरातील धमन्यांन मध्ये वाहणार्या पाण्याचं रक्त झालं. हे रक्त गडकिल्यांवर, डोंगर दर्यांवर, नदी नाल्यांनवर जेव्हा शिंपडलं गेलं,तेव्हा कुठे जाऊन हे स्वराज्य निर्माण झालं. मग त्या रक्तात येवढा ज्वर होता की हात तुटला तरी एका हाताने शत्रूला मारणारा कापणारा नरवीर तानाजी असो, या ६८ घाव आपल्या छातीवर घेऊन रक्ताची रंगपंचमी खेळून किंचीतही मागे न हटनारा, गजापूरची खिंड पावन करणारा शुरवीर बाजीप्रभू असो.असे शेकडो वीर आहेत ज्यांच्या शेकडो काहण्या आज ही हिथल्या मातीत इथल्या मनामनात जिवंत आहे. इथला इतिहास कधी मेलाच नाही. गेली, मेली ती फक्त माणसं.जाता जाता देऊन गेली आपल्या पिढ्यांना आपल्या वंशजांना ते आपलं स्वाभिमानी रक्त. आणि तेच रक्त आता पाझरतंय पिढ्यांन पिढ्या मधून. उतरतय माणसा माणसांच्या मनात, वाहतंय त्याच्या धमन्यांन मधून त्यांचा अभिमान, स्वाभीमान बनून….


अशा ह्या क्रांतीकारी रक्तात, शरिरात करोणा विषाणू किती वेळ तग धरणार. त्याला ही हार मानावी लागेल, संपाव लागेल, जावं लागेल. उपासमारी, लाचारी, बेरोजगारीने मरण्यापेक्षा करोणाशी लढत, जगत मेल्यालं काय वाईट. मुळात तो तुम्हच्या प्रचंड ईच्छाशक्ती,प्रतिकार शक्तीपुढे तग धरणार नाही. हे तर पाहतायचं आता तुम्ही सारं. आता गरज आहे ती करोणा सारख्या शत्रू बरोबर गमिनी काव्याने लढण्याची. गर्दीत तो वार करतो, एकट्यावर तो कधीच घाला घालत नाही. तलवार ढाल नव्हे तर आता वेळ आहे, social distance ठेवून मास्क वगैरे वापरून, आरोग्य विषयक खबरदारी घेऊन आपलं काम, कर्तव्य करत त्याच्याशी लढण्याची, रडण्याची नव्हे. तुळजापुरची आई भवानी, कोल्हापुरची अंबाबाई., शनी शिंगणापुरचा महादेव, मोरगावचा मोरेश्वर, जेजूरीचा खंडेराया, पंढरीचा पांडूरंग पाहतायेत सारं. तुमचा देव अजून देवळात आहे. देऊळ सोडून गेलेला नाही, तो सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे, तुम्ही फक्त हार माणू नका प्रयत्न आणि धीर सोडू नका..◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *