गडचिरोलीत एसआरपीएफच्या ७२ जवानांना करोनाची लागण

गडचिरोलीत एसआरपीएफच्या ७२ जवानांना करोनाची लागण

🔻 ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

गडचिरोली,(१८ जुलै ):–  गडचिरोलीत संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये असलेल्या राज्य राखीव पोलीस बलाच्या (एसआरपीएफ) ७२ जवानांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर मुंबईहून आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शनिवारी सकाळी एकूण ७३ जण करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.

आरोग्यविभागाच्या माहितीनुसार, पोलीस विभागातील मुंबईहून परतलेला इतर एकजण करोनाबाधित आढळला आहे. तर गडचिरोलीत संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये असलेल्या एसआरपीएफचे ७२ जवान करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे आज एकूण ७३ जण करोनाबाधित आढळले आहेत, तर ४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण करोनामुक्त रुग्णांची संख्या ११३ वर पोहोचली आहे. सध्या सक्रिय करोनाबाधितांची संख्या १६५ असून एकाचा मृत्यू झाला आहे.

गडचिरोली एकूण करोनाबाधितांची संख्या २७९ वर पोहोचली आहे. जिल्ह्याबाहेरील रहिवासी पण जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या करोनाबाधितांची संख्या ५१ वर आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात एकूण करोनाबाधितांची संख्या ३३० वर पोहोचली आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *