अवघ्या अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

अवघ्या अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

🔻सावली तालुक्यातील पाथरी गावात ही घटना

🔻( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

चंद्रपूर,18 जुलै :- अवघ्या अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेनं चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. सावली तालुक्यातील पाथरी गावात ही घटना घटली आहे. पीडित मुलीच्या शेजारी राहणाऱ्या 45 वर्षीय नराधमानं हे कृत्य केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, सावली तालुक्यातील पाथरी येथे माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे. घराशेजारी राहणाऱ्या एका 45 वर्षीय नराधमाने अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी पीडित चिमुरडी घराबाहेर खेळायला गेली होती. काही वेळानंतर ती रडत घरी आली. आईने चौकशी केली. तिला संशय आल्यानं तिनं मुलीला ग्रामीण रुग्णालयात नेलं. तिची वैद्यकीय तपासणी केली. वैद्यकीय तपासणीनंतर अधिकाऱ्यांनी तिच्यावर अत्याचार झाल्याचं निदान केलं.

मुलीच्या आईने तातडीनं पाथरीच्या पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन आरोपी जितेंद्र रामदास मेश्राम याच्याविरोधात तक्रार दिली. पाथरी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. दोन पथक तयार करून आरोपीचा शोध घेऊन अटक केली. जितेंद्र रामदास मेश्राम असं आरोपीचं नाव असून पोलिसांना त्याला अटक केली आहे. आरोपी विरुद्ध पाथरी पोलीस स्टेशनमध्ये बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत तसेच कलम 376, अ, ब सह कलम 4, 6, 10 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या घटनेची माहिती होताच संपूर्ण गावात तीव्र पडसाद उमटले लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधामास कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सर्व पाथरीवासीय नागरिक करीत आहेत.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *