◼️ काव्यरंग :- कर्जदार…

🔴 कर्जदार….

एवढा का जीव माझा कर्जदार होता

त्यांच्या श्वासात माझ्या चितेचा धूर होता…

धरती माय माझी होती तहानलेली
अन् पाऊस घोषणांचा मुसळधार होता…

खंगलेले मायबाप अन् भंगलेले पोरंबाळ
रस्ता संसाराचा केवढा बेकार होता…

पेरतो मातीत जे मी नुसते नव्हे बियाणे
त्यांच्यात मौजूद माझ्या रक्ताचा पाझर होता…

माझ्या ताटात मजला माझा घास नाही
पोट माझाच माझ्याशी असा गद्दार होता…

सोडून गेले गाव ते म्हणे शेतीत काय आहे?
तोंडात फक्त त्यांच्या पगाराचा सूर होता…

मांडू तरी कोणापुढे ही कैफियत माझी
मैफिलीत माझ्या रसिक क्रुर होता…

प्रलंबित त्याच्या खटल्यात देणार साक्ष कोण
वावरात फासावर झुलत साक्षीदार होता…!

छातीत माझ्या मी खुपसला नांगर होता
माझ्या अन्नाला जागणार कोणता सरकार होता…?

 श्वासात माझ्या चितेचा धूर होता…

◼️✍️ खुशाब लोनबले,
पवनपार ता. सिन्देवाही जि. चंद्रपूर
(९६८२१३००८५)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *