लॉकडाऊनमध्ये लोकांचा जास्तीत जास्त वेळ लॅपटॉप किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर

लॉकडाऊनमध्ये लोकांचा जास्तीत जास्त वेळ लॅपटॉप किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर

घराबाहेर पडणं अशक्य झाल्याने सर्व कामे ऑनलाईन होत आहेत. लोकांचा जास्तीत जास्त वेळ लॅपटॉप किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर जात आहे.

🔻 ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

पुणे : कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळात खूपजण ऑनलाईन काम करत आहेत. म्हणजे सर्वच डिजीटल झाल आहे. ऑनलाईन स्क्रीनवर काम केल्याने आपल्या डोळ्यांवर त्याचा थेट परिणाम होतो.

डोळ्यांची काळजी घेण्यासाठी अंधारात लॅपटॉप किंवा मोबाईलवर काम करू नका. मंद प्रकाशात लॅपटॉपवर काम केल्याने डोळ्यांना होऊ शकते गंभीर नुकसान एलईडी स्क्रीनमधून निघणारे रेज अंधत्वाचे कारण ठरू शकतात .

घराबाहेर पडणं अशक्य झाल्याने सर्व कामे ऑनलाईन होत आहेत. लोकांचा जास्तीत जास्त वेळ लॅपटॉप किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर जात आहे. ऑफिसचे काम असो, शॉपिंग किंवा इतर काही काम, सारेच ऑनलाईन होत आहे. या सर्व गोष्टींत एका गोष्टीमुळे आपल्याला नुकसान होऊ शकते, ज्याची आपल्याला कल्पनाही नाही. ते म्हणजे आपले डोळे.

आपल्या डोळ्यांवर त्याचा थेट परिणाम होतो. नुकतेच एका रिपोर्टमध्ये आढळून आले आहे की, लॉकडाऊनच्या काळात डोळ्याच्या डॉक्टरांकडे सर्वात जास्त तक्रारींचे फोन आले. याशिवाय पाठदुखी, पायदुखी अशाही समस्या समोर आले आहेत.

◼️ नुकसान असे होते…
जेव्हां आपण अंधुक प्रकाशात काम करतो, तेव्हां हे काम आपल्या डोळ्यांच्या प्रकाशाने होते. सामान्य प्रकाशात काम करताना डोळ्यांवर जितका ताण येतो. त्यापेक्षा कितीतरी जास्त ताण अंधुक प्रकाशात काम करताना येतो. अंधुक प्रकाशात बघण्यासाठी डोळ्यांना जास्त काम करावे लागते, ज्यामुळे ते कमजोर होऊ शकतात. हे टाळण्यासाठी काम करताना प्रकाशाची रचना अशी करा की त्यामुळे डोळ्यांवर ताण येणार नाही.

संशोधनानुसार ज्या लॅपटॉप किंवा स्मार्टफोनच्या स्क्रीनवर आपण काम करता त्या स्क्रीनमधून अतिनील किरण बाहेर पडतात, ज्यामुळे अंधत्व येऊ शकते. तज्ञांचा सल्ला आहे की काम करताना चश्मा वापरा, जेणेकरून यूव्हीकिरण आणि अतिनील किरण थेट आपल्या डोळ्यांपर्यंत पोहचणार नाहीत. तसेच अंधारात लॅपटॉप किंवा स्मार्टफोन वापरणे टाळा.

◼️डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स…

डोळे चांगले ठेवण्यासाठी व्यायामावर लक्ष द्या.
ऑफिसची वेळ संपल्यानंतर किंवा बाहेर लॅपटॉप किंवा स्मार्टफोन वापरू नका. सतत स्क्रीनवर राहू नका. आपल्या स्क्रीन टायमिंगवर लक्ष द्या.आय ग्लास घालून लॅपटॉप किंवा स्मार्टफोन वापरा.आरोग्यदायक आणि समतोल आहार घ्या.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *