शिवसेना राजुराकडून व्यंकय्या नायडूचा निषेध

शिवसेना राजुराकडून व्यंकय्या नायडूचा निषेध

असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासह व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात घोषणाबाजी

🔻( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )
चंद्रपूर :—  22 जुलैला राज्यसभेच्या 44 सभासदांचा शपथविधी सोहळा सुरु असताना नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा दिली. त्यालाच आक्षेप घेत सभापती व्यंकय्या नायडू यांनी असले घोषवाक्य सभागृहात चालणार नाही हे माझे सभागृह आहे तुमचे घर नाही अशी भूमिका घेत संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला.

त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात काल दि 23 जुलैला बल्लारपूर येथे तर आज दि 24 जुलैला राजुरा शिवसेनेच्या वतीने व्यंकय्या नायडू यांचा निषेध नोंदवण्यात आला.

या प्रसंगी शिवसेनेचे नगरसेवक राजू डोहे, माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे, विधानसभा संघटक नरसिंग मादर, शिवसेना नेते उमेश गोरे, जीवन बूटले निलेश गंपावार,जावेदभाई,शुभम पोलजवार, रसुल शेख, उमेश वासुदेव चापले, रमेश झाडे, बंटी मालेकर,आसिफ शेख, क्रिष्णा कुंभाला, राजू येरावार, महेश चन्ने, प्रदीप येनूरकर, नितीन निब्रड, आकाश राठोड, प्रवीण मोरे, गणेश चोथले आणि महिला पदाधिकाऱ्यांमध्ये माजी जि.प सदस्या सरिताताई कुडे, आशाताई उरकुडे, दीपालीताई बकाने आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *