डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे ’10’ प्रेरणादायी विचार

डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे ’10’ प्रेरणादायी विचार

भारताचे लोकप्रिय दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना देशाचे ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखलं जायचं.

कलाम यांची भाषणे नेहमीच प्रेरणादायी असत. त्यांच्या भाषणातील अनेक विचार चांगलेच लोकप्रिय झाले होते. यापैकी काही निवडक विचार आज आपण जाणून घेऊ…

1. स्वप्न ती नाहीत जी रात्री झोपल्यावर येतात, स्वप्न ती आहेत जी रात्रभर झोपू देत नाही.

2. पाऊसात इतर पक्षी आसरा शोधत असतात पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्या वरती जाऊन उडत असतो. समस्या एकच असते पण दृष्टिकोन वेगळा असतो.

3. काळा रंग हा अशुभ समजला जातो. पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थांचे आयुष्य उज्ज्वल करत असतो.

4. अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत.

5. तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका. कारण, दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय केवळ नशीबाचा भाग होता, असे म्हणायला अनेकजण सज्ज असतात.

6. यशाचा आनंद अनुभवण्यासाठी व्यक्तीला आयुष्यात अडचणींची सामना करणे आवश्यक असते.

7. यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही.

8. यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.

9. जेंव्हा तुमची सही ऑटोग्राफ बनते तेव्हा तुम्ही यशस्वी झालात समजा.

10. देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरचं सापडतात.

🙏 आजही त्यांचे विचार, त्यांची शिकवण नेहमीच सर्वांना प्रेरणा देणारी विशेषत: युवा पिढीला स्फूर्तिदायक ठरते.◼️

2 Replies to “डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे ’10’ प्रेरणादायी विचार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *