🔴 आधी आपला ध्येय ठरवा..
काही वर्षांपूर्वीचीच गोष्ट आहे. संभा आणि सुधाकर हे दोघे भाऊ. संभाच वय जवळपास ३५ वर्ष तर सुधाकरच वय चाळीसीच्या जवळपास होत. दोघेही विवाह बंधनात अडकलेले. त्या दोघांचं फारसं पटत नव्हतं त्यामुळे एकाच गावात मात्र वेगवेगळे राहायचे.
संभा थोडा भोळा होता. पण सुधाकर खुप हुशार,चतूर आणि थोडा अहंकारी होता. त्याने आपल्या चतूराईने बरीच मालमत्ता गोळा केली होती. त्यामुळे त्याला आता इतरत्र धावपळ करायची गरज भासत नव्हती. असा सुधाकर, देवदर्शनाला धावून जाणारा. महाराष्ट्रातील सगळ्याच धर्मस्थळ, देवस्थान,पर्यटन स्थळांना तो भेट द्यायचा. भक्ती, पुजा पाठ नियमित करायचा. अनेक प्रकारच्या मुर्त्या, फोटो त्याच्या देवघरात होती. तासन् तास तो पुजा करायचा. सतत देवालयात देव शोधयचा.
बिचारा संभा, परिस्थिती जेमतेमच त्याची मात्र मनाने खुप श्रीमंत आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा गर्व नाही. मिळेल तितकं खाऊन खुशाल जगायच एवढंच कळतं त्याला. त्यानं जबरदस्तीने किंवा चालाखीने कधीच काही मिळवलं नाही. मिळेल त्यात समाधान मानून आपलं कुटुंब चालवायचा. सगळं ठिक चाललं होतं.
आता ऋतूंप्रमाणे दिवसही बदलले. आणि एक दिवस संभाला सुधाकरचा काम पडला. संभाची पाऊलं सुधाकरच्या घराकडे वळली. चेहऱ्यावर तोच आपुलकीचा रुबाब ठेवून एक एक पाऊल समोर टाकत राहीला. अखेर संभा सुधाकरच्या घरी पोहचला.
ईकडे तिकडे बघीतला पण सुधाकर दिसत नव्हता. दोघांचं काही जमेना म्हणून संभा घरात प्रवेशही करु शकत नव्हता. संभा उभा उभाच विविध विचारांच्या दुनियेत हरवला होता.तेवढ्यात सुधाकरच्या
घरी घरकाम करणारा मजुर संभाकडे धावत आला.
संभाला पाहून, (मजुर)बोला काय हवं आपल्याला ?
संभा म्हणाला, मला (सुधाकर ) तुझ्या मालकाला भेटायचं आहे.
घरी आहेत का ते ? मला बोलायचं आहे त्यांच्याशी. असं सांगून संभा शांत झाला. तसं मजुराने उत्तर दिला.
मजुर : मालक देवघरात पुजा करत आहेत. थोडा वेळ लागेल त्यांना. संभा विचारात पडला, सुधाकर बाहेर येईपर्यंत काय करावं सुचेना. संभाला तिथेच एका टेबलवरती इंग्रजी, मराठी, हिंदी, भूगोल, इतिहास, गणित, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अशी विविध विषयांची छोटी पुस्तके समोर दिसली. संभाने एक पुस्तक हाती घेतला आणि वाचू लागला.
ईकडे संभा पुस्तक वाचत होता तर तिकडे सुधाकर पुजा करण्यात मग्न होता. संभाच पुस्तक वाचून झालं. अर्धा तास निघून गेला. तो त्या मजुराला विचारु लागला. झाली का रे बाबा तुझ्या मालकाची पुजा ? मजुर म्हणाला, नाही . शंकराची पुजा झाली आता विष्णूची पूजा करत आहेत. संभाला काय करायचं सुचत नव्हतं त्याने
दुसरा पुस्तक हाती घेतला आणि वाचू लागला. बघता बघता तेही पुस्तक वाचून संपवलं. परत संभाने त्याला विचारलं, झाली का रे बाबा पुजा ? उत्तर ऐकू आलं. विष्णूची पूजा झाली आता साईची पुजा करत आहेत. संभा पुस्तक वाचत राहीला, सुधाकर पुजा करत राहिला. आणि मजुर संभाने केलेल्या प्रश्र्नांची उत्तरे देत होता.
संभा पुस्तक वाचत राहीला, सुधाकर पुजा करत राहिला..
दिड, दोन तास निघून गेले. संभाने जवळपास ७/८ पुस्तक वाचून काढली.. तेवढ्यात सुधाकर आपली पुजा आटोपून बाहेर आला.. सुधाकरची नजर संभाकडे भिरकली… त्याच्या हातात पुस्तक दिसलं.
दोघांची दृष्टादृष्टी झाली.. चेहऱ्यावर थोडं स्मित दिसू लागलं होतं.
सुधाकर म्हणाला, अरे तू हे काय करतो आहेस. त्यावर संभा म्हणाला,
माझ्या मनात एक प्रश्न आहे. त्याचं उत्तर मी या पुस्तकांत शोधत आहे.
सुधाकर अवाक् झाला. त्याच मन थोडं स्थिरावल. तो बोलला, अरे तुला उत्तरच शोधायचं आहे ना, तर आधी प्रश्न मनात घे. तो प्रश्न कुठल्या विषयावर आहे ते लक्षात घे आणि तिच पुस्तक हातात घे. एवढी पुस्तक वाचून काढयची काय गरज आहे…त्यावर संभा म्हणाला, अरे मला सुद्धा तुला हेच सांगायचं आहे…की तुला देवच शोधायचं आहे ना तर एवढ्या फोटोंची पुजा करायची काय गरज आहे..पुजाच करायची आहे ना तर एकाच (फोटोची) देवाची कर ना…देव देव एकच.. कशासाठी उगाच वेळ वाया घालवतोस… हे ऐकताच सुधाकरच मन बहरून आल, त्याला खुप आनंद झाला. तो लगेच संभाच्या मिठीत जाऊन शिरला.
सांगायच तात्पर्य एकच की, उगाच वेळ वाया घालवण्यापेक्षा, आधी आपला ध्येय ठरवा. आणि त्यानुसार चालत रहा.
◼️ विशाल मोहरले, मु.पवनपार ता. सिंदेवाही
जि. चंद्रपूर मो. ७०८३३३५०५३