राजुरा येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

राजुरा येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

🔻( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

◼️  ग्रामीणरुग्णालय राजुरा येथे फळ आणि नोज मास्क तर अंगणवाडी मध्ये बालकांना पौष्टिक आहाराच्या किटचें वाटप

◼️ तालुक्यात शिवसेनेचा झंजावात चालूच… वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील असंख्य सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश


राजुरा,(२७ जुलै):-  येथे राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला.

माझा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासून शेतकऱ्यांना, गरजूना मदत करून साजरा करण्यात यावा असं नम्र आव्हान मुख्यमंत्र्यांनी केले होते.

त्याच पार्श्वभूमीवर आज राजुरा शिवसेनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ आणि मास्क तर अंगनवाडीतिल कुपोषित बालकांना पौष्टिक आहारचे किट वाटप करण्यात आले,

याच दिवसाचे विशेष महत्व म्हणजे आज तालुक्यातील अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला.

प्रामुख्याने राजुरा येथील सामाजिक कार्यकर्ते वसिम अन्सारी, रामपूर येथील भाजप पुरस्कृत माजी महिला उपसरपंच वर्षा पंदीलवार व त्यांच्या आघाडीच्या महिला सहकारी, विरूर येथील भाजपचे माजी विभाग प्रमुख विक्की मोरे यांनी आपल्या संपूर्ण सहकारी कार्यकर्त्यासोबत प्रवेश घेतला.

या प्रसंगी नगरसेवक राजू डोहे, माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे, विधानसभा संघटक नरसिंग मादर, शिवसेना नेते जिवन बुटले, निलेश गंपावार,जावेदभाई, शुभम पोलजवार,राजु येरावार, उमेश गोरे उपतालुका प्रमुख बंटी मालेकर, रमेश झाडे, वासुदेव चापले, सुरेश बुटले, धर्मेंद्र चौघरी,प्रविन करमनकर,बालु कुईटे,मनोज कुरवतकर, सुनील गौरकार, असिफ शेख,महिला आघाडीच्या नेत्या सरिताताई कुळे, आशाताई उरकुडे, दिपाली बकाने, आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *