चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 423 वर 261 कोरोनातून बरे ; 160 वर उपचार सुरु

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 423 वर

◼️261 कोरोनातून बरे ; 160 वर उपचार सुरु

चंद्रपूर, दि. 27 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 421 झाली आहे. 261 बाधित बरे झाले असून 160 बाधितावर उपचार सुरू आहेत. तेलंगाना येथील एका महिलेचा 24 जुलैला मृत्यू झाला. तिचा स्वॅप चंद्रपूर येथे पॉझिटिव्ह आला होता. याशिवाय एका महिलेला कोरोना शिवाय अन्य आजाराच्या गंभीरते मुळे नागपूरला हलविण्यात आले आहे. या दोन पॉझिटिव्हमुळे चंद्रपूर जिल्ह्याची आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह संख्या ( 421 + 2 ) 423 झाली आहे.

तथापि ,आज पुढे आलेल्या 18 बाधितांमध्ये सिंदेवाही तालुका ( 6 ) गडचांदूर ( 3 ) चिमूर तालुका ( 3 ) बल्लारपूर शहर ( 2 )  चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ( 3 ) व अन्य राज्यातील एका बाधिताचा समावेश आहे. काल सायंकाळपासून आज सहा वाजेपर्यंत एकूण 18 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कालपर्यंत 403 असणारी बाधितांची संख्या आज 421 झाली आहे.

काल सायंकाळपासून आज सायंकाळपर्यंत पुढे आलेल्या बाधितामध्ये बल्लारपूर शहरातील कागज नगर येथून परतलेल्या 28 वर्षीय युवकांचा समावेश आहे. बाहेरून आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात  ठेवलेल्या युवकाचा 25 जुलै रोजी स्वॅब घेण्यात आला होता.

दुसरा युवक 30 वर्षीय असून वाराणसी येथून आला असल्याची नोंद आहे. वाराणसी वरून आल्यानंतर गृह अलगीकरणात  ठेवलेल्या युवकाचा 25 जुलै रोजी स्वॅब घेण्यात आला होता.

चिमूर तालुक्यातील वडाळा पैकु येथील टीचर कॉलनीत राहणाऱ्या पती-पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एका विवाह सोहळ्यासाठी या दोघांनी यवतमाळ येथून प्रवास केला होता.

चिमूर येथील इंदिरा नगर चेंबूर येथील 28 वर्षीय महिला धामणगाव येथून प्रवास करून परत आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात होती. पॉझिटिव्ह ठरली आहे.

नागपूर येथून प्रवास केल्याची नोंद असलेल्या सिंदेवाई येथील 45 वर्षीय महिला व  तिचे 24 व 19 वर्षीय मुले पॉझिटिव्ह आले आहेत.

सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी येथील 20 वर्षीय चेन्नई येथून प्रवासाचा संदर्भ असणारा युवक संस्थात्मक अलगीकरणात होता. तो पॉझिटिव्ह ठरला आहे.

सिंदेवाई तालुक्यातील गुंजेवाही येथील रहिवासी असणारा 20 वर्षीय युवक हा देखील चेन्नई येथून परतला होता. संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या या युवकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे.

सिंदेवाई शहरातील रहिवासी असणारा नागपूर येथून परतलेला 17 वर्षीय युवक देखील पॉझिटिव्ह आला आहे.

गडचांदूर येथील एकता नगर वार्ड क्रमांक चार मधील 15 वर्षीय मुलगा संपर्कातून पॉझिटिव्ह ठरला आहे.

गडचांदूर येथीलच लक्ष्मी थेटर जवळील रहिवासी असणारा 42 वर्षीय पुरुष संपर्कातून पॉझिटीव्ह ठरला आहे. कोरपना तालुक्यातील पालगाव येथील 60 वर्षीय व्यक्ती संपर्कातून पॉझिटिव्ह ठरला आहे. चंद्रपूर येथील पैनगंगा पोलिस कॉर्टर परिसरातील 49 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरला आहे.

हैदराबाद येथून परतलेला 43 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरला आहे. संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या चंद्रपूर शहरातील रयतवारी येथील या व्यक्तीचा 25 तारखेला स्वॅब घेण्यात आला होता.

याशिवाय जटपुरा वार्ड येथील संपर्कातून 48 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे. या महिलेचा पती देखील पॉझिटिव्ह ठरला होता .

याशिवाय तेलंगणा राज्यातील काजीपेठ वारंगल येथील रहिवासी असणारा 65 वर्षीय व्यक्ती चंद्रपूर येथे आल्यानंतर पॉझिटिव्ह ठरला आहे. अन्य राज्यातील या रहिवाशांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना चंद्रपूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *