स्वतंत्र 8 अ व सातबारा नसलेल्या शेतकऱ्यांनीही पीक विमासाठी संपर्क साधावा : कृषी अधीक्षक

स्वतंत्र 8 अ व सातबारा नसलेल्या शेतकऱ्यांनीही पीक विमासाठी संपर्क साधावा : कृषी अधीक्षक

चंद्रपूर,दि.28 जुलै : पिक विमा घेण्यासाठी 8अ व सातबारा नसल्यामुळे येणारी अडचण शासनाने दूर केली आहे. आता अशा शेतकऱ्यांना देखील पीक विमा काढता येणार आहे. त्यासाठी कृषी विभाग अथवा बँक किंवा विमा कंपनीशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 मध्ये राज्यातील अधिसूचित जिल्ह्यातील अधिसूचित पिकांकरिता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 7/12 आणि इतर अनुषंगिक कागदपत्राद्वारे या योजनेत सहभाग नोंदविला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना वन जमिनीचे वाटप करण्यात आलेले आहे. सदर जमिनीची नोंद वनखंड क्रमांकाच्या स्वरूपात असून अशा वनजमिनी बाबत 7/12 उतारे जारी झालेले नसल्याने, महाराष्ट्र राज्यातील असे अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियम 2006 अंतर्गत वैयक्तिक वनहक्क पट्टाधारक शेतकरी त्यांचे नावे 7/12 उतारे निघत नाहीत.

योजनेअंतर्गत सहभागासाठी शेतकऱ्यांचा स्वतःचे 8 अ व 7/12 हे महसुली अभिलेख आवश्यक आहेत. तथापि, अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम 2006 अंतर्गत वैयक्तीक वनहक्क पट्टाधारक यांचे नावे 7/12 उतारामध्ये इतर हक्कामध्ये नोंदविण्यात येतात. त्यामुळे त्यांचे नावे स्वतंत्र 8 अ व 7/12 हे महसुली अभिलेख उपलब्ध होत नाहीत. यामुळे योजनेमध्ये सदर शेतकऱ्यांना राष्ट्रीय पीक विमा संकेतस्थळाद्वारे सहभाग नोंदविता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तेव्हा अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पीक घेणारे व योजनेमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम 2006 अंतर्गत वैयक्तिक वनहक्कधारक यांचे विमा प्रस्ताव तपासून विमा कंपनी स्तरावर प्राप्त करून घेण्याचे आणि विमा कंपनीचे लॉग इन द्वारे सहभागी शेतकऱ्यांचा तपशील पीक विमा पोर्टल वर नोंदविण्याचे निर्देश आयुक्त कृषी यांनी विमा कंपनीना दिला आहे. तेव्हा अशा शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कृषी विभाग अथवा बँक अथवा तालुका स्तरावरील विमा कंपनी कडे दिनांक 31 जुलै 2020 पर्यंत या योजनेत सहभागी होण्यात तातडीने संपर्क साधावा.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *