सर्वसामान्य जनतेचा लोकनेता ते “मास लीडर” सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या व्यक्तिमत्त्वाची व्यक्तिरेखा…

सर्वसामान्य जनतेचा लोकनेता ते “मास लीडर” सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या व्यक्तिमत्त्वाची व्यक्तिरेखा…

विकासाप्रति असलेली तळमळ, अमोघ वक्तृत्व, अफाट ज्ञान अशा अनेक पैलुंनी ज्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध केले आहे, असे हे सर्व समाजासाठी काम करणारे लोकनेते, विकासपुरुष म्हणजे सुधीर मुनगंटीवार !

प्रभावी, उत्तम आणि अफाट जनसंपर्क व कुशल प्रशासन, उत्तम नियोजन, आदर्श व्यवस्थापन…
राजकारण हा प्रांतच स्पर्धेचा, दगदगीचा आणि सतत कार्यरत ठेवणारा आहे. अनेक जण वेगवेगळ्या अपेक्षांनी नेत्याकडे पाहत असतात. त्या अपेक्षा पूर्ण करण्याची आणि त्याचबरोबर कोणालाही नाराज न करण्याची खुप मोठी कसरत करावी लागते. हि कसरत पूर्ण करत असताना राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकीय पटलावर आपली अमिट छाप पाडणारे, एक सर्वसामान्य कार्यकर्ता, भाजपाचे आणि राज्याचे पूर्व अर्थमंत्री-वनमंत्री हा सुधीरभाऊनचा प्रवास थक्क करणारा आणि प्रेरक आहे, रोमांचक, थरारक आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व विविधांगी आहे. सुधीरभाऊ यांच्याकडे हे कौशल्य अगदी वाखाणण्यासारखे आहे.

गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी, जनभावनेचा मूड जाणण्यासाठी, लोकसंपर्कासाठी, जनसंपर्क हा प्रत्येक राजकीय नेत्याचा ऑक्सिजन असतो. त्यातून जनतेशी सतत ‘कनेक्ट’ राहणं हे लोकनेता सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या गतिमान नेत्याच्या राजकारणाचाच अतूट भाग असतो. तेच त्यांचं मुख्य राजकीय भांडवल असतं. त्याच बळावर मुनगंटीवार यांच्यासारखा नेता ‘मास अपील’ मिळवतो. लोकनेता बनतो. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं, त्यांना प्रभावित करणं आणि आपलं भवितव्य निश्चित करणं, ही तळागाळातून वर आलेल्या प्रत्येक लीडरची कार्यशैली असते. म्हणूनच त्यांच्याच जिल्ह्यातील चांदा ते बांदा त्यांचे चाहते आणि प्रशंसक सर्वत्र मोठया संख्येने आढळतात. ज्यांना ‘मास लीडर’ म्हटले जाते, त्या वर्गातले सुधीरभाऊ मुनगंटीवार अग्रगण्य नेते आहेत.

खरं तर मंत्र्यांचा रुबाब काय असतो, हे नव्याने सांगण्याची गरज नाही, मात्र सुधीरभाऊ येथे अपवाद ठरतात. त्यांना खुर्चीचा किंवा पदाचा थोडासाही गंध नाही म्हणूनच ते कॅबिनेट मंत्री होते तरी आपण आधी कार्यकर्ते आहोत याचा विसर ते पडू देत नव्हते. वने आणि वित्त अश्या दोन दमदार कॅबिनेट खाती जवळ असताना हा भला माणुस थोडीशीही अरेरावीची, गर्वाची भाषा वापरली नाही. याचे नवल तर वाटणारच. सौजन्यशील आणि अतिशय नम्रता असलेल्या भाषेतून अगदी सामान्य व्यक्तीला ते आपल्या साधेपणाचा परिचय जवळून देतात.

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी आपल्या वेगळेपणाची छाप जनतेवर उमटवली आहे, अशा मोजक्या नेत्यामध्ये आता राज्याचे माजी वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. जीव ओतून काम करणा-या या नेत्याने अवघ्या महाराष्ट्राला आपल्या काळात “महावनमहोत्सव” या उपक्रमात ५० कोटी “महावृक्षलावगडी”ची लोकचळवळ निर्माण केली होती. यामाध्यमातून त्यांनी वृक्षलागवडीचा व वृक्षसंर्वधनाचा नवा मंत्र दिला होता. शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, वन व वन्यजीव प्रेमी या वनमहोत्सव मोहिमेत स्वत:ला झोकून दिले होते. राज्याच्या राजकारणात अथक परिश्रमाच्या बळावर स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणारा नेता, सध्याच्या मंत्रिमंडळातील फार कमी चेहऱ्यांपैकी एक आश्वासक चेहरा अशी ओळख सुधीरभाऊंनी निर्माण केली आहे.

मुख्यत्वे सत्ता वाट्याला येण्याचे प्रसंग अपवादात्मक असताना जिद्दीने आणि चिकाटीने पक्षकार्य सुरू ठेवायचे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. परंतु हे आव्हान, हि लीलया मुनगंटीवार यांनी उत्कृष्ट रीतीने पेलली आहे. त्यांच्यामध्ये एक धडपडया कार्यकर्ता, कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारा नेता, प्रेमळ मित्र, वत्सल पिता आणि कुटुंबवत्सल माणूस लपलेला आहे. त्यांच्या निकट संपर्कात आलेल्यांना यात कोणतीही अतिशयोक्ती वाटणार नाही. मुळात “सुधीर” या नावातच एक मोठी ताकद आहे. स्वतःचा जनसंचय हीच मुनगंटीवार यांची खूप मोठी ताकद आहे. हात लावील त्याचे सोने करील, अशी त्यांची कार्यशैली.

समोर येणाऱ्या प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास, दूरदृष्टी, सर्वांचा विचार व विकास, विकास आणि फक्त विकासाचा ध्यास, प्रेमाचे आभाळ, मायेचा महासागर नेहमीच जमिनीवर असणारा स्वयंसेवक म्हणजे सुधीरभाऊ. मागील कार्यकाळात मुनगंटीवार यांनी सुद्धा हेच केलं. त्यामुळेच कि काय फडणवीस सरकार मधील एक कर्तबगार कार्यकर्ता मंत्री अशी छबी जनतेत तयार झालेली दिसून येते. त्यांच्याएवढा गतिमान मंत्री आजवर राज्याला लाभला नाही अश्या बोलक्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटू लागल्या होत्या.

स्थानिकांशी उत्तम संवाद साधण्याचं कौशल्य त्यांच्या अंगी ठासून भरलेले आहे. गोरगरिबांना आधार देणं, वेगवेगळे प्रश्न मार्गी लावणं यातच त्यांच वेगळेपण दिसून पडते. सुधीरभाऊंनी लोकांच्या मनावर राज्य केल आहे, म्हणूनच “फीडबॅक” त्यांना जनतेकडून मिळतो. त्यांच्या वक्तृत्व शैलीने तर सभास्थळी प्रचंड उत्साहाच वातावरण आपोआप निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

◼️ सुधिरभाऊ आणि पत्रव्यवहार 

सर्वसामान्य माणसाला मंत्र्यांकडून त्याच्या पत्राला जर उत्तर मिळावे अशी अपेक्षा असते, पण बहुदा ते उत्तर मिळेलच याची शास्वती राहत नाही आणि उत्तर मिळाले तर त्याच्या आनंदाला पारा उरत नाही. समोरच्या व्यक्तीला त्यातून समाधान मिळते, नेमके हेच समाधान महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला मिळतेय ते म्हणजे वनमंत्री सुधीर मूनगांतीवार यांच्याकडून. ते असे कि सुधीरभाऊ स्वत: प्रत्येक पत्राचा जातीने लक्ष्य देवून सबंधित विभागाकडे पाठपुरावा करत असतात. नुसते पत्र देवून मोकळे व्हायचे नाही ते काम पूर्ण झाले कि नाही, नाही झाले तर तर कुठे अडले? का अडले? काय अडचणी होत्या? त्यातील अडचणी, त्रुटी दूर करून तो प्रश्न सुधीरभाऊ निकाली काढतात. एखाद्या पत्रामध्ये निवेदनामध्ये नाविन्यपूर्ण विषय असला तर भाऊ त्याची नोंद स्वत:च्या डायरीमध्ये घेतात. ते स्कॅन स्वाक्षरीचा फार वापर करीत नाही. भाऊंना स्वाक्षरी करायला खूप आवडते ते अगदी मनापासून. एवढ प्रेम ते समान्य व्यक्तीला समोर ठेवून करतात. माझा एक मिनिट देखील वाया जावू नये, हा विचार त्यांच्या कायम मनात असतो. त्यांना सतत कामात राहायला आवडते. सुधीरभाऊंच्या व्यक्तिमत्त्वाची तुलनाच होऊ शकत नाही. माझ्या माहितीनुसार गाडीमध्ये भाऊंच्या गाडीमध्ये एक चिमटा बोर्डवर कोरा कागद असतो त्यावर दोन भाग असतात. एका भागावर कुठली काम करायची नि दुसऱ्या भागावर कुठल्या कामाचा पाठपुरावा करायचा. हि भाऊंना जेमथेम १९९५ पासून आहे. पत्राचे उत्तर ते सर्वांनाच देतात. सुधीरभाऊ शक्यतो कुठल्याही सामान्य माणसाला दुःखवत नाहीत. कुणीही आले तरी ते त्यांना सहज पत्र देतात.

◼️ मिस कॉल आणि मेसेजला मिळतो प्रतिसाद 

सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा मंत्र्यांना फोन करतो तेव्हा त्याला अपेक्षित असते कि त्या मंत्र्यांनी दोन शब्द आपल्या सोबत बोलणे मात्र त्या व्यक्तीचा अपेक्षाभंग झाल्याशिवाय राहत नाही, कारण अनेकदा आमदार, खासदार, मंत्र्यांकडून फोनला प्रतिसाद मिळत नसतो. सामान्य व्यक्तीच्या आलेल्या मिस कॉलला देखील सुधीरभाउंचा प्रतिसाद मिळतो. दिवसभर मिटिंग आणि कार्यक्रम संपले कि भाऊ सुटलेले कॉल घेणे सुरु करतात. त्यांची रिप्लाय देण्याची पद्धत आगळी-वेगळी आहे. हेलो… मी सुधीर मुनगंटीवार बोलतोय, आपण मला कॉल केला होता, बोला काय म्हणणे आहे आपले !! असाच त्यांचा रिप्लाय असतो. एवढच नव्हे तर एखाद्याने मेसेज केला असेल तर त्याला भाऊ वेळेनुसार उशिरा का होईना रिप्लाय देतात. एखादा महत्त्वपूर्ण मेसेज असेल तर त्याची प्रिंट आउट काढून नोंद घेतात. मिस कॉलला प्रतिसाद देणारे सुधीरभाऊ मुनगंटीवार हे एकमेव मंत्री असावेत अस माझ मत आहे.

◼️ चंद्रपूरच्या विकास वैभवात भर

पुढच्या शंभर वर्षात आठवण राहिल अशा काही वास्तू त्यांच्या पाच वर्षांच्या काळात निर्माण झाल्या आहेत. यामध्ये सैनिकी शाळा ,वन अकादमी ,बोटॅनिकल गार्डन, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, नियोजन भवन, कोषागार भवन, अभ्यासिका, वसतिगृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा क्रीडा संकुल, वनविभागाची देखणी विश्रामगृहे, इको पार्क, उभे राहत असलेले मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल ,दाताळा फुल, प्राथमिक आरोग्य केंद्र,पोलिस ठाण्यांच्या इमारती, अशा कितीतरी पायाभूत सुविधांनी चंद्रपूरच्या वैभवात भर टाकली आहे.

विकासाची दूरदृष्टी असणाऱ्या अशा या लोकनेत्याला वाढ दिवसानिमित्त नव्या गगन भरारी साठी खुप खुप शुभेच्छा, त्यांना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *