राजुरा शहरातील विलगीकरण केंद्रातून पळून गेल्याने इसमावर गुन्हा दाखल

◼️राजुरा शहरातील विलगीकरण केंद्रातून पळून गेल्याने इसमावर गुन्हा दाखल
 राजुरा (३० जुलै ) : कोविड-१९ या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याचे अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत राजुरा शहरातील शिवाजी वॉर्ड येथील म्हाडा कॉलनी परिसरातील आदिवासी मुलांचे वस्तीगृह येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्र उभारण्यात आलेले आहे.
 सदर केंद्रातील व्यक्ती नामे सचिन ठाकूर वय 38 वर्ष राहणार पेठ वॉर्ड पाझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने दिनांक. 27 / 07 / 2020 रोजी विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले होते.
 दिनांक. 28 / 2 / 2020 रोजी ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे स्वब नमुना देऊन दुपारी 2.30 च्या परत आणले असता सदर व्यक्ती दारू पिऊन असल्याचे निदर्शनास आले व गोंधळ घालणे सुरू केले तसेच दुपारी4.30 वाजता पळून गेला त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम कलम 51 व साथरोग प्रतिबंधक अधिनियम 1897चे कलम 3 व भारतीय संहिता १८६०चे कलम 188 269, 270, 271 नुसार नोडल अधिकारी ज्ञानेश्वर सोनवाणे यांचे तक्रारीनुसार मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांचे द्वारे राजुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. राजुरा पोलीस स्टेशन ठाणेदार चे मार्गदर्शन काली पुढील तपास हेडकॉन्स्टेबल अरुण मेश्रम करीत आहेत.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *