🔴 तो ठरतोय तरुणांसाठी प्रेरणा…!
◼️ सचिन मेकाले यांचा ध्येयवेडा शिक्षणप्रवास..
◼️✍️ सुनिल गेडाम सिंदेवाही प्रतिनिधी
सिंदेवाही :- आजच्या जगात परिस्थिती शी झगडून दोन हात करणारे समाजात खुप कमी लोक असतात. अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यतील विकासाच्या बाबतीत अत्यंत मागास समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात असेच एक नाव समोर आले, ते म्हणजे सचिन मेकाले यांचे, घरची परिस्थिती एकदम बेताची असतांना संघर्ष करून आज सचिन मेकाले यांनी यशाचा शिखर गाठलं आहे. सचिन चा जन्म जिवती तालुक्यातील शेनगाव इथे गरीब कुटुंबात झाला. सोबतच नशिबाला अठराविश्व दारिद्य्रचा वारसा मिळाला,वडील शेती करायचे तर आई मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावायची. यातच सचिन ला अभ्यासाची आवड होती, प्राथमिक शिक्षण वसंतराव पाटील आश्रम शाळा पिट्टीगुडा तर माध्यमिक शिक्षण प्रियदर्शनी विद्यालय शेनगांव येथे झाले. पुढे जिवती येथील विदर्भ महाविद्यालयातून वीज्ञान शाखेतून पदवी उतीर्न केली.म्हणतात यश अगदी सहज मिळत नाही, आणि सचिन च्या बाबतीत असच होत गेलं. घरची बेताची परिस्थिती असताना खचून न जाता,मिळेल ते काम केले. हॉटेल मध्ये वेटर चे काम, पेंटिंग चे काम, व वेळप्रसंगी हमाली सुद्धा केली. शिकायची आवड असल्याने कसे बसे नागपूर गाठून डॉ आंबेडकर कॉलेज इथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला इथे पण प्रचंड मोठं आव्हान सचिन समोर उभ होत, पण खचून न जाता, काही दिवस मित्रांच्या खोली मध्ये काढले, आणि मग शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळवला व २०१७ ला आपली एल. एल. बी. ची डिग्री पूर्ण केली. अश्यातच घरातील कुटुंबातील लोकांना वाटत होत की आपला मुलगा आपला भाऊ मोठा साहेब होणार, आणि कुटुंबातील सदस्याचा भविष्यातील आधार होणार, आश्यातच सचिनचे वडील आजारी पडले, वडिलांना पूर्वी पासून दम्याचा आजार होता.अश्यातच सचिन पुढं एक मोठं संकट उभ राहील, त्याला मोबाईल वरून आईने घरी यायला सांगितलं, वडिलांची तब्बेत खूपच बिघडली होती. बातमी मिळताच सचिन घरी येण्यासाठी निघाला, सहा तास प्रवास करून तो आपल्या मूळ गावी पोहचला.समोर खाटेवर झोपून आजारी असलेले सचिनचे वडील सचिनला न्याहाळत होते. एक दिवस घराची सर्व कुटुंबाची जबाबदारी सचिन वर सोपवून सचिनच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला.सचिनने वडिलांची तेरावी न करता पारंपरिक रूढींना फाटा देत तेरावी साठी येणाऱ्या खर्चाची रक्कम दहा हजार रुपये एका शिक्षण संस्थेला दान देऊन दुर्गम भागात एक आदर्श निर्माण केला.मग परत सचिन नागपूरला येऊन क्रिमिनल लॉ मध्ये एल. एल. एम. २०१९ मध्ये पूर्ण केले. गावात व शहरात वाटेल ते काम करणारा सचिन आज अॅड सचिन मेकाले झाला. सोबतच सचिन आपल्या शिक्षणचा समाजास फायदा व्हावा व समाजाचे आपल्याला देणे आहे, या भावनेने नेहमी पुढे असतो. सचिन ज्वलंत कवी, प्रेरणादायी वक्तासुद्धा आहे. महाराष्ट्र राज्यासहित छतीसगढ , मध्यप्रदेश , आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ राज्यात समाज प्रबोधनानिमित्य अनेक कार्यक्रम त्याने केली आहेत.
आजच्या तरुणाईसाठी सचिनचा प्रवास एक प्रेरणाच ठरत आहे.◼️