पवनपार ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकाने केला आर्थिक गैरव्यवहार

पवनपार ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकाने केला आर्थिक गैरव्यवहार
🔷 चौकशीची ग्रामपंचायत सदस्यांची मागणी

◼️✍️ (सिंदेवाही प्रतीनिधी)
सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मौजा पवनपार येथील ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकाने मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला असुन संवर्ग विकास अधिका-यांनी चौकशि करण्यात यावी अशी मागनी उपसरपंचासमवेत ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे,.
कसल्याही प्रकारचे मासिक सभा ,ठराव न घेता ग्रामसेवक आर्थिक व्यवहार करीत आहेत. जमा खर्चाचा हिशोब सदस्यानी मागितला असता जमा खर्चाचा दिल्या जात नसल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.
मासिक सभेचा जमाखर्च सांगितल्या जात नसल्याने अखेर ग्रामपंचायत सदस्यांनी माहिती अधिकारा अंतर्गत माहिती मागितली. मागीतलेली माहिती अर्घवट दिली आहे. माहिती अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीत ग्रामपंचायतच्या खर्चात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचे उघडकिस आले आहे. अनेक ठिकाणी अतिरीक्त खर्च दाखवण्यात आला.
ग्रामपंचायत भवन, अंगणवाडी नं१, अंगणवाडी नं २ ची रंगरंगोटी करीता ६२००० रूपये खर्च दाखवण्यात आला. मात्र अंगणवाडी नं२ रंगरंगोटी केलीच नाही. अंगणवाडी नं२ चे बांधकाम नव्यानेच करण्यात आल्याने रंगरंगोटी करण्याचा प्रश्न च येत नसल्याने तिथे गैरव्यवहार झाले असल्याचे दिसते.
गेल्या वर्षी मुरूम टाकण्याक आला.त्याचा खर्च १०,००० रुपये मुरूम टाकने व ५००० रुपये मुरूम पसरवने असा दाखवण्यात आला. हा खर्च प्रत्यक्षात करण्यात आला नाही तर तो खर्च दाखवण्यात आला.
विहिरीचे गाळ काढने १६००० रुपये काढले मात्र दोन वर्षापासुन विहीरीचे गाळ काढलेच नाही.
एकाच व्यक्तीच्या नावावर वेगवेगळे व्हावचर दाखवण्यात आला आहे.
हातपंप दुरूस्ती न करता पैशाची उचल दाखवली आहे.
 एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक व्हावचर दाखवण्यात आला आहे.
ग्रामपंचायत मधुन मिळालेल्या माहिती नुसार पान नं२२मधील व्हावचर क्रमांक १३७ मध्ये २५००₹, पान नं २६ व्हावचर क्रमांक ७४ व ७५ मध्ये अंगणवाडी नं १ व२ चा रंगरंगोटी खर्च ९०००, ९०००₹ आणि पान नं २५ सामान्य कश बुक मध्ये व्हावचर क्रमांक १५ मध्ये ४२७५ ₹ दाखवण्यात आला आहे.
व्हावचर क्रमांक ८ सामान्य कॉश बुक १५००० ₹ रपटा बांधकाम, पान नं १८ व्हावचर क्रमांक १३ नळदुरूस्ती ५००० रुपये नळ दुरूस्ती झालीच नाही.
व्हावचर क्रमांक ४ मुरूम टाकने १०००० रुपये व व्हावचर क्रमांक ९ सामान्य कॉशबुक मुरूम पसरविने ५०००₹ हा खर्च न करता दाखवण्यात आला आहे.
सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागनी उपसरपंच संदिप गुरूनुले, सौ मनिषा बारसागडे सदस्य, प्रमोद वाढई सदस्य, कांताताई कंगाले सदस्य, भारती भेंडारे सदस्य यांनी केली आहे◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *