शिवसेनेचे मनपा सदस्‍य विशाल निंबाळकर यांचा भाजपात प्रवेश

शिवसेनेचे मनपा सदस्‍य विशाल निंबाळकर यांचा भाजपात प्रवेश

🔻 आ सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहीर यांनी पक्षप्रवेशाबाबत दिल्‍या शुभेच्‍छा !

🔻 संघटन, सेवा, लोकसंवाद आणि संघर्ष ही भाजपाची पंचसूत्री – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक विशाल निंबाळकर यांनी भाजपात प्रवेश घेतला. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार आणि माजी केंद्रीय गृह राज्‍यमंत्री हंसराज अहीर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत संपन्‍न झालेल्‍या या पक्षप्रवेश सोहळयात विशाल निंबाळकर यांनी आपल्‍या समर्थकांसह भाजपात प्रवेश घेतला.

यावेळी आ. किर्तीकुमार भांगडीया, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे, भाजपाचे महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, राजेंद्र गांधी, प्रमोद कडू, उपमहापौर राहूल पावडे, विजय राऊत, राजीव गोलीवार, माजी महापौर अंजली घोटेकर, प्रकाश धारणे, अनिल फुलझेले यांच्‍यासह महानगरपालिकेतील भाजपाचे सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

आ. सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहीर यांनी विशाल निंबाळकर यांचे स्‍वागत करत पक्षप्रवेशाबद्दल त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्‍हणाले, विशाल निंबाळकर यांनी भाजपाच्‍या माध्‍यमातुन लोकसेवेचे ध्‍येय बाळगून पक्षप्रवेश केला. आम्‍ही सर्व खंबीरपणे त्‍यांच्‍या पाठीशी आहोत. कर्तृत्‍वशाली युवक पक्षाला वाढ‍वतील याचा मला विश्‍वास आहे. भाजपा हा कार्यकर्त्‍यांचा पक्ष आहे. चंद्रपूर शहरातील तरूणाई संगठीत करून त्‍या माध्‍यमातुन भाजपाचे संघटन वाढविण्‍याची जबाबदारी विशाल निंबाळकर यांच्‍यावर आली आहे. संघटन, सेवा, लोकसंवाद आणि संघर्ष ही भाजपाची पंचसूत्री आहे. गेल्‍या सहा वर्षात पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी लोकहिताचे अनेक निर्णय घेत भाजपाशी जनतेचे नाते अधिक दृढ केले आहे, असे सांगत आ. मुनगंटीवार यांनी विशाल निंबाळकर आणि त्‍यांच्‍या समर्थकांना शुभेच्‍छा दिल्‍या.

यावेळी बोलताना माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर यांनी सुध्‍दा विशाल निंबाळकर व समर्थकांना शुभेच्‍छा दिल्‍या. युवकांपर्यंत भाजपाचा विचार पोहचवत जास्‍तीत जास्‍त युवक भाजपाशी जोडण्‍याच्‍या प्रक्रियेत विशाल निंबाळकर यशस्‍वी होतील असा विश्‍वास त्‍यांनी यावेळी बोलताना व्‍यक्‍त केला. कार्यक्रमाचे संचालन अॅड. सुरेश तालेवार यांनी केले. ◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *