जिल्हाधिकारी कार्यालयातील 3 कर्मचारी पॉझिटीव्ह, आज शुक्रवारी एका दिवशी 28 बाधिताची नोंद

🔴  चंद्रपूरजिल्ह्यातील बाधितांची संख्या 523 वर 322 कोरोनातून बरे ; 201 वर उपचार सुरू

◼️  आज शुक्रवारी एका दिवशी 28 बाधिताची नोंद

◼️  जिल्हाधिकारीकार्यालयातील 3 कर्मचारी पॉझिटीव्ह

◼️  जिल्हाधिकारीकार्यालयातील 70 कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले

चंद्रपूर, दि. 31 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या दररोज वाढत असून आज जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन कर्मचारी देखील पॉझिटिव्ह ठरले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 523 लोकांना कोरोना आजाराची लागण झाली असून 322 बाधित बरे झाले आहेत. सध्या 201 बाधितावर उपचार सुरू आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल 495 असणारी रुग्णसंख्या आज सायंकाळपर्यंत 523 झाली आहे.एकाच दिवशी 28 बाधित जिल्हयातून पुढे आले आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन लिपिकांचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या संपर्कातील सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू होती. निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेआठ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील 70 कर्मचाऱ्यांचे नमुने घेण्यात आले.

आज पुढे आलेल्या पॉझिटिव्ह नमुन्यांमध्ये ब्रह्मपुरी तालुक्यातून 3, चिंतलधाबा पोंभुर्णा या ठिकाणावरून 2, पोंभुर्णा शहरातून एक, भद्रावती तालुक्यातून एकूण 4 नागरिक पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये कुचना येथील 2, एकता नगर येथील एक, भद्रावती शहरातील आणखी एक बाधिताचा  समावेश आहे. गडचांदूर लक्ष्मी टॉकीज जवळ आणखी दोन रुग्ण पुढे आले आहेत. तर चंद्रपूर शहरातील शक्तिनगर व दुर्गापूर परिसरातून प्रत्येकी एक बाधित पुढे आला आहे.

रात्री उशिरा आणखी पुढे आलेल्या बाधितामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन, नागभीड येथील औरंगाबाद वरून आलेले एकूण पाच, व अँन्टीजेन चाचणीमध्ये पुढे आलेले एकूण सहा अशा दिवसभरातील 28 बाधितांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी तीन बाधित जिल्हाधिकारी कार्यालयात पुढे आले असल्याची पुष्टी केली असून नागरिकांनी गरज नसताना सरकारी कार्यालयांमध्ये गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे. सर्व कर्मचाऱ्यांची, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात येत असून सर्वांची आवश्यक ती काळजी घेतली जात असल्याचे स्पष्ट केले.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *