◼️ काव्यरंग :- ऑनलाईन शिक्षण..गरिबाच्या व्यथा…

ऑनलाईन शिक्षण..गरिबाच्या व्यथा…

परिस्थीती नाही मायी,
गेलो पूरा तुटून..
सांगा गुरुजी मोबाईल मी,
आणू तरी कुठून…?

एकाएकी कोरोनाची,
महामारी आली..
या महामारीत आमची,
लायच दैना झाली..

कामधंदा हातातला,
गेला माया सुटून..
सांगा गुरुजी मोबाईल मी,
आणू तरी कुठून…?

खाले नाही घरात माया,
जवारीचा दाणा..
लेकरं म्हणते बाबा मले,
मोबाईल आणा..

लेकरायनं मागणी त्याची,
अशी धरुन रेटून..
सांगा गुरुजी मोबाईल मी,
आणू तरी कुठून…?

शेतीवाडी नाही आमचं,
काम नाही मोठं..
मजुरीच्या भरोस्यावर ,
आहे आमचं पोटं..

पोट भागून जराशे ,
पैशे शिल्लक पाडतो..
त्याच्यातच अडचणीचे,
दिवस आमी काढतो..

लॉकडाऊनच्या काळामंदी,
थेच कामी आले..
होते काही गुरुजी जमा,
सारेच खर्च झाले..

होतं-नोतं कोरोनानं,
नेलं सारं लुटून..
सांगा गुरुजी मोबाईल मी,
आणू तरी कुठून…?

शेजारी एक दिवस,
पोरगी मायी गेली..
अभ्यासाले हातामंदी,
पेन-वही नेली..

शेजारीन राजेहो,
अशी गरम झाली..
मने कोरोनाची साथ आहे ,
इथं कायले आली..

असं कस मने तुमी,
ध्यानात घेत नाही..
असं घरी कोणाच्याबी,
जाता येत नाही..

पोरीले गुरुजी माया तिनं,
देल्लं नाहो उठून..
सांगा गुरुजी मोबाईल मी,
आणू तरी कुठून…?

काल गुरुजी पोरगं,
मायाजोळं आलं..
मले मने शिक्षण आता,
ऑनलाईन झालं..

आता मले मोबाईल,
पायजे नेटवाला..
दहा-बारा पंधरा हजार ,
अशा रेटवाला..

म्या मनलं बाबू पैशे,
नाही आपल्या पाशी..
त पोरगं म्हने बाबा मंग मी,
घेतो आता फाशी..

सांगा गुरुजी पोराले मी,
कसं समजून सांगू..
पैशासाठी सांगाना,
कोणाले भीक मांगु..

करीन पोरगं कमी-जास्त,
जीव पडला धाकी..
एकच इचार डोक्यामंदी,
सुचत नाही बाकी..

घडी-घडी डोयातला,
बांध येते फुटून..
सांगा गुरुजी मोबाईल मी,
आणू तरी कुठून…?

◼️ साभार…वायरल कविता..fb post ◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *