कोरोना च्या पार्श्व भूमीवर जिल्हा परिषद शाळा बंद असल्याने शालेय विद्यार्थी चे वळन जुगाराकडे

कोरोना च्या पार्श्व भूमीवर जिल्हा परिषद शाळा बंद असल्याने शालेय विद्यार्थी चे वळन जुगाराकडे

◼️✍️ ( सुनील गेडाम, प्रतिनिधी )

सिंदेवाही : कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जिल्हा परिषद शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.हा निर्णय कोरोना विषांणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात आला.पण ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांची अवस्था खुप दैनींय आहे.कारण आई-वडील मोलमजुरी करण्यासाठी शेतात काम करत असतात.

विद्यार्थी पानटपरी वर बसून खर्रा घोटताना पाहवयास मिळत आहे.यामुळे विद्यार्थी वाईट व्यसनाच्या आहारी जाण्याची शक्यता आहे.गावात गुरूजी असले तर मुलांना भीती वाटत असते . पण या कोरोना महामारी मुळे गुरूजी गावाकडे फीरकत नाही.

शासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचे धडे देण्याचे आदेश केले.पण ग्रामिण भागात इंटरनेट मोबाईल फोन आणायचा तरी कुठून असा प्रश्न पाल्यांना पडत आहे.ग्रामिण भागातील विद्यार्थ्यीं रस्त्यावर फिरताना दिसत आहे.

त्यामुळे पाल्यांची सुध्दा चिंता वाढली आहे.जिल्हा परिषद शाळा बंद असल्याने ग्रामिण भागात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विषयाकडे दुर्लक्ष होत आहे.पाल्यांना सुध्दा घरी शीक्षणाचे धडे देण्यासाठी वेळ नाही. पाल्यं आपल्या कामासाठी बाहेर जावे लागते.त्यामुळे पाल्यांचे सुध्दा मुलांनवर लक्ष देणं शक्य होत नाही आहे. विद्यार्थी कल आता वाईट व्यसनाकडे जाताना पाहवयास मिळत आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *