वाघाने केला शेतक-यावर हल्ला, शेतकरी जखमी

 दबा धरून बसलेल्या वाघाने  केला शेतक-यावर हल्ला, शेतकरी जखमी
🔺 संग्रहित छायाचित्र
🔷 सिंदेवाही तालुक्यातील पवनपार परिसरातील घटना
🔷 शेतकऱ्यांनी आरडा ओरडा केल्यावर वाघाने केला पोबारा

◼️✍️जितेंद्र पेंदाम सिंदेवाही (प्रतिनिधी)

 सिंदेवाही (१ ऑगस्ट ):- तालुक्यातील पवनपार येथील एका शेतकर्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना आज दुपारी चार वाजताच्या दरम्याण घडली.
सविस्तर वृत  असे की, पवनपार परीसरात आता शेतीची कामे मोठ्या जोमाने सुरू आहेत. काम झाल्यावर दुपारच्या वेळी शेतकरी आपली गुरे शेताजवळ असलेल्या खाली जागेत चरायला नेत असतात. आज असेच शेतकरी आपली शेतीचे कामे करून बैल चारत असतांना अचानक दबा धरलेल्या वाघाने गोकुळ रुषी निकुरे वय ६० वर्षे या शेतक-यावर  हल्ला केला. यात शेतकरी जखमी झाला. सोबत चारपाच शेतकरी असल्याने व त्यांनी आरडा ओरड केल्याने वाघाने पोबारा केला आणि शेतकरी  गोकुळ निकुरे वाचला.
 ही घटना  कम्पारमेन्ट नं २८२ खोदतलावजवळ घडली. अचानक याच रस्त्याने  जंगल गस्त करून येत असतांना एस के येरमे वनरक्षक ही घटना पाहिली. वनरक्षक यांनी लगेच जखमीला
गुंजेवाही येथील प्राथमिक केंद्रामध्ये उपचारा करीता पाठवन्यात आले .◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *