पिकअप ने तीन अंगणात खेळणाऱ्या मुलांना चिरडले ; एकीचा मृत्यू एक गंभीर जखमी तर एक बचावली

पिकअप ने तीन अंगणात खेळणाऱ्या मुलांना चिरडले

एकीचा मृत्यू ; एक गंभीर जखमी तर एक बचावली

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : रात्री जेवण झाल्यानंतर घराच्या अंगणात चिमुकले खेळत होते. अचानक रोडवरून चालणारा पिकअप अंगणात घुसला. या अनपेक्षित अपघातात सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. दुसरा बालक गंभीर जखमी झाला. तिसरी चिमुकली खड्ड्यात पडल्यान बालबाल बचावली. गावकऱ्याच्या काळजाचे पाणी हिरावणारी ही दुर्दैवी घटना गोंडपिपरी आष्टी मार्गावरील नवेगाव वाघाडे येथे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवेगाव वाघाडे येथील पंढरी मेश्राम यांचे घर प्रमुख मार्गाला लागून आहे. त्यांची मुलगी अलस्या (७), अस्मित मेश्राम (१०), माही रामटेके (१२) ही बच्चेकंपनी रात्री जेवण झल्यानंतर अंगणात खेळत होते. यावेळी आष्टीवरून भरधाव येणाऱ्या पिकअप वाहन चालकाचे नियंत्रण सुटले. अन् मुख्य मार्गावरून पिकअप गाडी नालीवरून थेट मेश्राम यांच्या अंगणात घुसली.

गाडी थेट अलस्या हिला जाऊन धडकली. यात अलस्या व अस्मित गंभीर जखमी झाले. एका खड्ड्यात फेकल्या गेल्यान माही बालबाल बचावली. जखमींना गोंडपिपरीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती केल्यानंतर अलस्यचा मृत्यू झाला. अस्मिताची गंभीर अवस्था बघता पुढील उपचारासाठी चंद्रपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार संदीप धोबे करीत आहेत. गावात घडलेल्या या दुर्दैवी घटनेन प्रचंड शोककळा पसरली आहे. ◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *