ग्रामीण भागात कोरोनाने आध्यात्मिक व भजन सूर भंगले

ग्रामीण भागात कोरोनाने आध्यात्मिक व भजन सूर भंगले

◼️ श्रावण मासात करतात आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन

◼️  पुर्वी सव्वा महिना चालत होता हा कार्यक्रम

◼️  भजनाच्या घ्यावा लागत होत्या तारखा

सिंदेवाही(जितेंद्र पेंदाम) :- चातुर्मास हा भावीक लोकांसांठी पर्वणीचा काळ. श्रावणमासाची सरुवात अमावस्या म्हणजे दीप पूजा महिन्यापासुन सुरू होते. हे महिने म्हणजे व्रतवैकल्याचा ,उपवास करण्याचे दिवस.
शहरी भागात पेक्षा ग्रामिन भागात ह्या महिन्याना फारच महत्व आहे.आषाढ महिन्यापासुन म्हणजे व्यास पूजा पासुन तर कार्तिक मासा पर्यंत ग्रामिण भागात विशेष महत्व दिले आहे. या महिन्यात पुर्वी पुर्वज आध्यात्मिक ग्रंथ वाचायचे. घरा घरामध्ये ग्रंथांचे वाचन व्हायचे. अद्यापही ही परंपरा ग्रामिण भागात पाहायला मिळते.
आध्यात्मिक ग्रंथामध्ये गुरूगीता. नवनाथ पुराण, ज्ञानेश्वरी , तुकारामांचीअभंग गाथा, हरीविजय कथासार, भक्तीविजय कथासार, पांडव प्रताप, रामविजय कथासार, रामायन, महाभारत, श्रिकृष्ण गीता, कथाकल्पतरू पुराण, शिवगीता, हनुमान चालिसा, विष्नू पुराण, गरूड पुराण,यासारख्या अठरा पुराणापैकी एकतरी ग्रंथ ग्रामिण भागातील घरात वाचत असतात. ज्यांना हे शक्य नसते ते लोक आपल्या घरी भजनाचा कार्यक्रम ठेवत असतात.
या महिन्यात भजनाच्या तारखा घ्यावा लागत होत्या. हे कार्यक्रम विशेषत: श्रावण महिन्यात जास्त असतात. श्रावण महिना पूजा अर्चना करण्याकरीता महत्वाचा व मोलाचा असतो. या महिन्यात गुरूमार्ग घेतलेले व्यक्ती गुरूच्या प्रतीमेला पुजून रोज संध्याकाळी आरती केली जातात.
श्रावण महिन्यात शेतीचे कामे मोठ्या प्रमानात असतात. रोवनीचे कामे अंगावर ताण आननारे असते. मात्र रोवनीचे कामे करूनही भाविक लोक पुराण ऐकायला येत असतात. पुराण वाचुन झाल्यावर किंवा पुराण ऐकल्यावर पुराणमध्ये असलेल्या कोडं ,कठिन शब्दावर चर्चा होत असते. नंतर आरती करून अध्याय संपविल्या जात असते. अशी दैनंदीन दिनचर्या श्रावण महिन्यात होत असते. पूजा अर्चना व भजनाच्या आध्यात्मिक सूर संगितात श्रावण महिना कसा जायचा हे कळतच नव्हतं.
परंतु यावर्षी कोरोना ने हाहाकार माजवला असून पोथी पुरानावर व श्रावण मासातील कार्यक्रमावर बंधन आलेली आहेत. कडक बंधन नसली तरी भितीचे बंधन फारच झाले आहे. त्यामुळे ग्रामिण भागातील सामुहीक ग्रंथ वाचण ,भजन ,पुजनावर विर्जन पडले हे निश्चित.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *