भावाच्या रक्षनासाठी..एक आगडा वेगळा रक्षाबंधन…

भावाच्या रक्षनासाठी..एक आगळा वेगळा रक्षाबंधन…

भावाने आपल्या बहिणींच्या रक्षणासाठी केली मास्क आणि सॅनीटायझरची भेट

पोंभुर्णा :-  कोरोनाच्या सावटाखाली यंदा भाऊ आपल्या बहिणीला रक्षेचं बंधन बांधतोय. अशाच प्रकारे आजचं रक्षाबंधन पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार या गावी उराडे परिवारात पार पडलं. बहीण आम्रपाली आणि आरती हिने आपल्या भावाला राखी आणि मास्क बांधून तर बहिणीला रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून भावाने सॅनीटायझची भेट दिली.‘सध्या कोरोनाच्या या संकटात  भावाला मास्क आणि सॅनीटायझरची गरज आहे. त्यामुळे आज बहिणीकडून  रक्षाबंधन ला भावाला राखी आणि मास्क बांधून बहिणींनी एक आगळावेगळा रक्षाबंधन साजरा केला.तर भावाकडून भेटंही अनोखी आहे’  तर कोरेनाच्या संकटात प्रत्येक भावाने आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी मास्क आणि सॅनीटायझरची भेट द्यावी, आणि बाहेर पडताना प्रत्येक बहिणीने आणि भावाने मास्क वापरावा, असं आवाहन यावेळी या दोन्ही बहिणींनी केेलं आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारने तर खबरदारी म्हणुन वेगवेगळे उपक्रम व समाजामध्ये सतर्कतेचा ईशारा तर दिलाच पण या बहिणींनी भावाच्या रक्षणासाठी मास्क दिला व भावाने बहिनीला ओवाळनीमध्ये सॉनीटायझर भेट वस्तु देवुन समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारे रक्षाबंधन साजरा करण्यात आला. व याप्रकारे च बहिनीने या कोरोना च्या संकट काळात भावाची रक्षा म्हणुन असच काही करुन रक्षाबंधन साजरा करावे, अशी प्रतिक्रिया बहिणींनी व भावाने यावेळी दिली.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *