सिंदेवाही तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने पोलिस स्टेशन सिंदेवाही येथे रक्षाबंधन

सिंदेवाही तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने पोलिस स्टेशन सिंदेवाही येथे रक्षाबंधन

◼️✍️ सुनिल गेडाम प्रतिनिधी

सिंदेवाही: अहोरात्र जनतेच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांचे आभार मानत, त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करून सिंदेवाही पोलिस मुख्यालयात पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या सहकार्याने- पोलीस उपनिरीक्षक नेरकर साहेब, पाटील साहेब, इतर पोलिस अधिकारी /कर्मचारी यांना सिंदेवाही तालुका महिला कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राख्या बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला.

जनतेसाठी पोलीस बांधव अहोरात्र सेवा देत असतात तरीही त्यांना नेहमीच टीकेला सामोरे जावे लागते कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमीच तत्पर सेवा देणाऱ्या पोलीस बांधवांना राखी पौर्णिमेनिमित्त सिंदेवाही तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ सीमाताई सहारे यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाकरिता सिंदेवाही नगर पंचायतच्या अध्यक्ष आशाताई गंडाटे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिंदेवाही तालुका महिला काँग्रेस कमिटीचे महासचिव नंदाताई नरसाळे, संघटक लताताई गेडाम, महिला काँग्रेसचे सिंदेवाही शहर अध्यक्ष लक्ष्मीताई पेदूरवार यांचे विशेष सहकार्य लाभले.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *