◼️ काव्य रंग :- हयात….

◼️हयात…….

म्हणू तरी कशी मी माझी सरली हयात आहे
मी सत्तरीच्या आसपास अन् आरसा वयात आहे…

इशाऱ्यांचा जरी विझला असेल कंदिल केव्हाचा
आजही लाजरी चांदणी मिनमिनते ह्रदयात आहे…

पसरवली कुणी ? ही अफवा, मी तुला विसरली
जखम तुझ्या स्मृतीची हातावरच्या कोंदणात आहे…

आली असेल कदाचित एक सर तुझ्या ओसरीत कधी
भावना ओंजळीतली सतत डोळ्याला सतावत आहे…

जगावयाचे आहे तर वयाचा हिशोब ठेवू कशाला
वय सत्तरीच्या आसपास अन् मी पाळण्यात आहे…

मिळाले जरी माझ्या वाटणीचे मला चार खांदे
मी अनंतात अन् माझ्या पुण्याईची सुरूवात आहे…

म्हणू तरी कशी मी माझी सरली हयात आहे…..
◼️✍️ खुशाब लोनबले
पवनपार जि. चंद्रपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *