पीक विमा भरण्‍याची मुदत वाढवून ३१ ऑगस्‍ट करावी : सुधीर मुनगंटीवार

पीक विमा भरण्‍याची मुदत वाढवून ३१ ऑगस्‍ट करावी : सुधीर मुनगंटीवार

 केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले निवेदन

चंद्रपूर :- राज्‍यात पीक विमा भरण्‍याची मुदत वाढवून ३१ ऑगस्‍ट करण्‍याची मागणी राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्‍य व केंद्र सरकार यांच्‍याकडे केली आहे.

राज्‍यात पीक विमा भरण्‍याची मुदत ३१ जुलै २०२० होती. मात्र कोरोना विषाणुच्‍या प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्‍या लॉकडाउनमुळे शेतकरी ३१ जुलै पर्यंत पीक विमा भरू शकले नाही. सध्‍या शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकरी प्रचंड व्‍यस्‍त आहे. त्‍याचप्रमाणे ग्रामीण भागात इंटरनेटची समस्‍या आहे, सर्व्‍हर सतत डाउन राहत असल्‍यामुळे शेतक-यांना शेतीची कामे सोडून पीक विमा भरण्‍यासाठी जावे लागते व परत यावे लागते. यात त्‍यांच्‍या शेतीच्‍या कामांचा प्रचंड खोळंबा होत आहे.

यामुळे पीक विमा भरण्‍याची मुदत वाढवून ३१ ऑगस्‍ट २०२० करणे अत्‍यंत गरजेचे आहे असे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे, कृषीमंत्री दादाजी भुसे यांना पाठविलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनाही आमदार मुनगंटीवार यांनी पत्र पाठविले आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *