अनेक शतकांचा संघर्ष फळाला आला आ सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

अनेक शतकांचा संघर्ष फळाला आला
आ सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

रामनामाच्या जयघोषात कारसेवकांचा सत्कार
रामभक्तांनी साजरी केली दिवाळी

आ.सुधीर मुनगंटीवार यांनी सपत्नीक केले प्रभुरामचंद्राचे पूजन

चंद्रपूर :-  किमान ५ शतका पासून राममंदिराचा मुद्दा प्रलंबित होता. लाखो रामभक्तांनी यासाठी बलिदान दिले. अखेर या हा प्रश्न न्याय प्रक्रियेतून सुटला. न्यायालयाच्या आदेशाने आज हे लाखो रामभक्तांचे स्वप्न पूर्ण होत आहे. शतकाचा हा संघर्ष फळाला आला असे प्रतिपादन आ सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते महानगर भाजपा तर्फे आयोजित प्रभुरामचंद्राचे पूजन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
आयोद्धेमध्ये पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे शुभहस्ते भव्य राम मंदिर निर्माणकार्याचा शुभारंभ आज बुधवार (५ऑगस्ट) ला झाल्यानंतर सायंकाळी श्री अंचलेश्वर मंदिराच्या परिसरात प्रभू श्रीरामाचे पूजन केल्या नंतर आतिषबाजी करून रामभक्तांनी दिवाळी साजरी केली. विशेष म्हणजे यावेळी रामनामाच्या जयघोषात कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगर संघचालक ऍड रवींद्र भागवत व आ सुधीर मुनगंटीवार यांनी सपत्नीक प्रभुरामचंद्राचे पूजन केले.
या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे , भाजपा ज्येष्ठनेते राजेंद्र गांधी, प्रमोद कडू, महापौर राखीताई कंचरलावर , उपमहापौर राहुल पावडे, माजी महापौर अंजली घोटेकर , नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवर, विशाल निंबाळकर, संजय कंचरलावार, रवी आसवाणी, वंदना तिखे, ब्रिजभूषण पाझारे, दत्तप्रसंन्न महादाणी, प्रज्वलंत कडू, सुरज पेदुलवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी कारसेवक राजेंद्र गांधी, राजेंद्र कागदेलवार, राजेंद्र खांडेकर, रवींद्र धारणे, पुरुषोत्तम दिकोंडवार यांचा सत्कार करण्यात आला. संचालन प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रमोद क्षीरसागर, राहुल लांजेवार, सुनील डोंगरे, कृष्णा चंदावार, तेजासिंग,अक्षय शेंडे, सत्यम गाणार, पवन ढवळे, रामकुमार आकापेलिवार यांनी परिश्रम घेतले.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *