◼️ काव्यरंग :- पाऊस 🌧️…✍️ प.सु. किन्हेकर, वर्धा

 ⭕ पाऊस 🌧️

पहिला पाऊस पहिला पाउस

होती ओलेचिंब वायची हौस

घोंगसी छत्रीलाही न पेली धारा
पिकायची मोतीने काळी धरा !!

आता तर बरसाद दिसेना
ना तसी कोठेच झड लागेना
श्रावण आषाढघन थोडा दिलासा
कुणबी बापाला करी आपलासा !!

वीज अंबरास चिरून जाते
चमकत अशी कडाडून जाते
वाटे मना तू धो धो बरसील

अंगणी सडा शिंतोडे टाकते !!

नक्षत्रवार पाऊसकाळ चालायचा
पुराने नदी सागर काठ भरायचा
आवतन न देता पेरणी सादवुन
चारमाही मुक्कामी असायचा !!

वाहते दोनीडोळी अश्रू टिपुस
आक्रमक पवित्रा झोंबे वपुस
जिवलगा म्हणू की आळशी
का लावतो नभाशी घोर चुरस !!

चाहूल लागता करो शाकारणी
कौलारू छतांची वळचणी
सूर्य देखोनी आडोसास लपतो
काळीज होई रे पातळ पाणी !!

◼️✍️ प.सु. किन्हेकर, वर्धा
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *