युवक-युवतींनी मशरूम लागवड व प्रक्रिया प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा

युवक-युवतींनी मशरूम लागवड व प्रक्रिया प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे आवाहन

चंद्रपूर,दि. 7 ऑगस्ट :  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूर मार्फत 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरिता 17 व 18 ऑगस्ट 2020 रोजी 2 दिवस कालावधीचे मशरूम लागवड व प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील युवक-युवतींनी लाभ घ्यावा,असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी के. व्ही.राठोड यांनी केले आहे.

या प्रशिक्षणामध्ये मशरूमचे प्रकार व ओळख, लागवड, साहित्य व कच्चा माल, काळजी व देखभाल, मशरूम काढणे, वाढविणे व पॅकेजिंग प्रक्रिया, रोग, किड, निदान व उपचार, खाद्यपदार्थ व अर्थशास्त्र, बाजारपेठ पाहणी तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, इत्यादी विविध विषयावर विशेष तज्ञ मार्गदर्शक व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणात प्रवेश घेण्याकरिता इच्छुक युवक-युवतींनी दि.16 ऑगस्ट 2020 रोजी स्वतःचा बायोडाटा, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, आधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रांसह महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन, दुसरा माळा, गाळा क्र. 208 बस स्टॉप समोर, रेल्वे स्टेशन रोड,चंद्रपुर येथे उपस्थित रहावे. तसेच अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही.राठोड (मो.क्र.9403078773, 07172-274416), कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे ( मो. क्र.9011667717), कार्यक्रम आयोजिका लक्ष्मी खोब्रागडे (मो.क्र.9309574045) महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधावा.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *